File image of PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

भारतातील कोरोनाचे भीषण रुप लक्षात घेऊन मार्च महिन्यात सुरु झालेले लॉकडाऊन वाढवून तीन वेळा वाढविण्यात आले. सध्या देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन बाबत भारताची पुढील रुपरेषा काय असेल याबाबत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. या बैठकीनंतर आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यामध्ये मोदी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशातील सद्य कोरोनाची स्थिती पाहता हे लॉकडाऊन वाढेल की नाही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सोशल डिस्टंसिंग हा या रोगाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे ते जर नीट पाळले गेले नाही तर या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे लॉकडाऊन हटविले नाही तर देशात आर्थिक समस्या निरमाण होऊ शकते. तसेच रोजंदारीवर जगणा-या लोकांवर भूकमारीची वेळ येऊ शकते. या सर्वाचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतात COVID-19 रुग्णांची संख्या 70,000 च्या पार, 3604 नव्या कोरोना बाधितांसह एकूण आकडा 70,756

भारतात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असून देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 70,756 च्या घरात जाऊन पोहोचली आहे. यात गेल्या 24 तासांत देशात 3604 नवे कोविड-19 आढळले असून सद्य स्थितीत राज्यात एकूण 46,008 रुग्णांवर उपचार सुरु असून 22,455 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.