7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन फिटमेंट फॅक्टरच्या माध्यमातून 'या' पद्धतीने ठरवतात, जाणून घ्या अधिक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

7TH CPC News: कोरोना व्हायरसचे संक्रमण कमी होत चालले आहे. अशातच लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळणार आहे. रिपोट्सनुसार, सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) हा 1 जुलै 2021 पासून वाढवणार आहे. अशी अपेक्षा आहे की, सरकार महागाई भत्ता 17 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्याची शक्यता आहे. जर असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनात जबदरस्त नफा होणार आहे.(7th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी! गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने जारी केले नवे निर्देश)

सातव्या सीपीसी नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. फिटमेंट फॅक्टरचा वापर करुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात एकूण 2.5 टक्के अधिक वाढ झाली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनाची मोजणी 2.57 टक्क्यांच्या गुणाकाराने केली जाते. जी महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घराचे भाडे यांच्या अतिरिक्त असते.(7th Pay Commission Latest News: लाखो केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना DA Arrears बद्दल येत्या काही दिवसात मिळू शकतो मोठी बातमी)

उदाहरणार्थ, जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये आहे. तर त्याला मिळणारे भत्त सोडून त्याचे वेतन 46,260 रुपये (18,000X 2.57) असणार.

पगार ठरवल्यानंतर डीए, टीए, एचआरए, मेडिकल प्रतिपूर्ती सारखे भत्ते ठरवले जातात. महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा म्हणजेच जानेवारी ते जून आणि जुले ते सप्टेंबर महिन्यात ठरवला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 6 महिन्यातील एकूण महागाईच्या आधारावर ठरवला जातो.

तर डीए मध्ये वाढ ही टीए संबंधित असते. एकदा डीए घोषित झाल्यानंतर त्याच आधारावर टीए वाढवला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांची मासिक सीटीसी सर्व भत्त्यांच्या मोजणीनंतर ठरवण्यात येते.

देशभरात 50 लाखांहून अधिक स्थायी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना 1 जुलै पासून डीएमध्ये वाढ झाल्याचा लाभ मिळणार आहे. त्याचसोबत ईपीएफ आणि ग्रॅच्युटीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. ईपीएफ कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता 12 टक्के असतो.