7th Pay Commission Latest News: लाखो केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना DA Arrears बद्दल येत्या काही दिवसात मिळू शकतो मोठी बातमी
File image of central government employees (Photo Credits: IANS)

केंद्रीय सरकार कर्मचार्‍यांसाठी या आठवड्यात एक गोड बातमी येण्याची दाट शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार पगार घेणार्‍या लाखो कर्मचार्‍यांसाठी येते काही दिवस मोठी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. दरम्यान कोरोना संकटामध्ये कर्मचार्‍यांच्या महागाई भत्ताचे काही हफ्ते (DA Arrears) प्रलंबित आहेत. ते आता पुन्हा सुरळीत होण्याची दाट शक्यता आहे. याकरिता 26 जूनला एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार डीए (DA) दिला जातो.

सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांचा जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 अशा 3 हफ्त्यांचा डीए गोठवण्यात आला आहे. हा निर्णय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. सरकार आता या तिन्ही डीए चे हफ्ते जुलै 2021 पासून देणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप त्याची घोषणा करण्यात आलेली नाही. आता या गोष्टीवरच चर्चा करण्यासाठी 26 जूनला विशेष बैठक होणार आहे.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Cabinet Secretary Rajiv Gauba यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीमध्ये अर्थ मंत्रालयाचे अधिकारी, डीओपीटी, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या युनियनचे कर्मचारी सहभाग घेणार आहेत. 7th Pay Commission: महागाई भत्त्यात वाढ होण्याआधीच 'या' केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट.

आता कर्मचाऱ्यांना 17 टक्क्यांच्या दराने DA दिला जात आहे. पुढे 11 टक्क्यांहून वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या पगारात जबरदस्त वाढ होणार आहे. तर कर्मचाऱ्यांना थेट 2 वर्षांच्या DA चा फायदा एकत्रित मिळू शकतो. कारण जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला होता. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जून 2020 मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली होती. आता जानेवारी 2021 मध्ये महागाई भत्ता पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच एकूण 28 टक्के झालाआहे. यामुळे 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसह 61 लाख पेंन्शनर्सला फायदा होणार आहे.