Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
20 minutes ago

सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण संबंधित निर्णयाच्या विरुद्ध भीम आर्मी कडून 23 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक, चंद्रशेखर आझाद ; 22 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Poonam Poyrekar | Feb 22, 2020 11:36 PM IST
A+
A-
22 Feb, 23:35 (IST)

भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी उद्या म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भारत बंद ची हाक दिली आहे. राज्य सरकारी नोकरीत जातीय आरक्षण देणे तसेच नोकरीमध्ये बढतीच्या वेळी आरक्षणाचे फायदे देणे रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यांनतर आझाद यांच्याकडून देशव्यापी बंदाची हाक देण्यात आली आहे

22 Feb, 22:56 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 23  फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मन की बात मधून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत.

22 Feb, 21:35 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याने आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर भाष्य करत ट्रम्प आल्याने भारताला महासत्ता बनण्यात कितपत मदत होणार आहे असा सवाल केला आहे. देशाच्या प्रगती साठी पैशाच्या गुंतवणुकीसोबतच मनुष्यबळ देखील महत्वाचे आहे असेही ठाकरे यांनी म्हंटले आहे.

22 Feb, 20:11 (IST)

नुकताच प्रदर्शित झालेला बायको देता का बायको चित्रपटाचे अभिनेता आणि दिग्दर्शक यांना बीड जिल्ह्यातील आशा टॉकीज परिसरात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचे कारण अस्पष्ट असून स्थानिक पोलीस याप्रकणी अधिक तपास करत आहे. 

22 Feb, 19:47 (IST)

 

अकोला जिल्ह्यात वंचिन बहुजन आघाडीला मोठा धक्का लागला असून एकाच वेळी 47 सदस्यांनी राजीनामा दिल्याने पक्षाची चिंता वाढली आहे. माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कारांचाही यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

22 Feb, 19:14 (IST)

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी  15 कोटी 100 कोटींवर भारी आहे, असे विधान केले होते. यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलेले होते. यातच वारिस पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले शब्द मागे घेतो असे ते म्हणाले आहेत. तसेच माझे वक्तव्य हिंदू विरोधी नाही, मी सर्व धर्माचा आधार करतो, असेही ते म्हणाले आहेत. 

 

22 Feb, 18:38 (IST)

बळीराजाच्या न थांबणाऱ्या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती, अशा अनेक बाबींचा विचारांमुळे आमचा दरवर्षी साजरा होत असलेला 24 फेब्रुवारी 2020 रोजीचा वाढदिवस साजरा करु नका, असे उदयनराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. 

22 Feb, 17:42 (IST)

पिंपरी चिंचवड येथे एका भरघाव क्रेनने रस्त्यावरून जाणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाला उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात जेष्ठ नागरिकांचा मत्यू झाला असून क्रेन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

22 Feb, 17:20 (IST)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात वर्षा बंगलावर आज बैठक झाली. ही बैठक संपली असून यात कोणत्या विषयावर चर्चा झाली हे सध्या गुलदस्त्यात आहे. तसेच सीएए आणि एनपीआर आणि एल्गार परिषदच्या मुद्यावरून चर्चा झाली, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते. मात्र, या बैठकीत काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नसल्याची माहिती समोर आली होती. 

 

22 Feb, 16:03 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली भेटीनंतर आज 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहे. 

Load More

लासलगाव जळीतकांडातील पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर संपली. मुंबईतील मसिना रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजता उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अंगावर पेट्रोल टाकून काडी पेटविताना झालेल्या झटापटीत ही पीडिता गंभीररीत्या भाजल्या गेली होती. जेजे रुग्णालयात तिचे शवविच्छेदन केले जाणार असुन यानंतर अंतिम संस्कारासाठी तिला लासलगावला नेले जाणार आहे. . यातील प्रमुख आरोपी रामेश्वर भागवतला निफाड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. औरंगाबाद येथील भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी दिल्लीत भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत दिवंगत काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधानसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली होती.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली यावर मुख्यमंत्री आज शरद पवारांशी सविस्तर चर्चा करतील असे शक्यता वर्तविण्यात येत आहे.


Show Full Article Share Now