Constitution Day : 29 ऑगस्ट 1947 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, अनेक बैठका व चर्चासत्रांतर्गत भारतीय संविधानाचा मसुदा आकार घेऊन लागला. हा अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. याच दिवसाची आठवण म्हणून 2015 पासून भारतात ‘संविधान दिन’ (Constitution Day) साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. 2015 साली बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती होती, त्या निमित्ताने हा दिवस त्या वर्षीपासून साजरा करण्यात येऊ लागला. डॉ. आंबेडकरांच्या मुंबई मधील म्युझियमचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद मोदींनी ही घोषणा केली होती. राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येते.
15 ऑगस्ट, 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या गुलामीतुन हा देश स्वतंत्र झाला असला तरी, या देशातला माणुस नैतिक दृष्ट्या स्वतंत्र झाला नव्हता, स्वकियांच्या गुलामीतुन त्याची सुटका झालेली नव्हती. म्हणुनच या देशाला सर्वसमावेशकच घटना तथा मार्गदर्शक तत्व देऊनच ते साध्य करता येईल, या विचाराने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपली वाटचाल सुरू केली. अखेर 26 नोव्हेंबर 1949 ला लिखित मार्गदर्शक तत्वे तथा घटना अर्थातच संविधानाचा स्वीकार करण्यात आला.
26 जानेवारी 1950 पासून हे संविधान लागू करण्यात आले होते. भारताचे संविधान हे जगातील सवात मोठे संविधान आहे. 29 ऑगस्ट, 1947 पासून मसुदा समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा सात दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.
समितीचे काम 165 दिवस चालले, त्यावर विचारविनिमय झाला. 13 फेब्रुवारी, 1948 रोजी घटना समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. त्यावेळी 7635 दुरूस्त्या करण्यास सांगितल्या. त्यापैकी 2973 दुरूस्त्या मान्य करण्यात आल्या. घटनानिर्मितीसाठी 63 लाख 729 रू. इतका खर्च करण्यात आला होता. त्यामध्ये 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. भारताचे संविधान हस्तलिखित आहे, याची 1 हिंदी आणि 1 इंग्रजी आवृत्ती आहे, ज्यात 48 आर्टिकल्स आहेत.
26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हा दिवस होता 'भारतीय संविधान दिन'. मात्र तेव्हापासून शासन दरबारी हा दिवसाची 'काळा दिन' म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिवस 'काळा दिवस' म्हणून भारतीय जनतेमध्ये कायमचाच रूजला. या दिनाबाबत समाजामध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने लोकशाहीवर निष्ठा असलेल्या संघटनांच्या मागणीनुसार तत्कालीन कॉंग्रेस सरकारने 24 नोव्हेंबर 2008 मध्ये हा दिवस साजरा करण्याचा शासकीय अध्यादेश काढला होता. या संविधान दिनाची आठवण राहावी म्हणून, संविधान दिवसाच्या निमित्ताने भारतात विविध ठिकाण ई कार्यक्रम आयोजित केले जातात. निबंध, वक्तृत्व/भाषण, पेटिंग स्पर्धा शाळा, कॉलेजेस मध्ये आयोजित केल्या जातात. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी नसते, शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये संविधान संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात.