Rule Changes From 1st February (फोटो सौजन्य - फेसबुक, संपादित प्रतिमा)

Rule Changes From 1st February: आजपासून फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. पैशाशी संबंधित कामांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजपासून असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर होईल. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर करणार आहेत. आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपासून ते उच्चवर्गीय व्यक्तींसाठी अनेक घोषणा होऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

अर्थमंत्री आयकराची मूळ सूट मर्यादा 3 लाख रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकतात, अशी अपेक्षा आहे. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, 15 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के नवीन कर स्लॅब लागू केला जाऊ शकतो. (हेही वाचा -LPG Price Update: अर्थसंकल्पापूर्वी आनंदाची बातमी; एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त)

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल -

आज, 1 फेब्रुवारीपासून देशात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे, आज, 1 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 1797 रुपये झाली आहे. पूर्वी हे सिलेंडर 1904 रुपयांना उपलब्ध होते. तथापी, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. (हेही वाचा -Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार देशाचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कधी, कसे आणि कुठे पाहाल थेट प्रक्षेपण)

UPI संदर्भातील नियमात बदल -

आजपासून UPI ​​वापरकर्त्यांसाठी एक मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही UPI व्यवहार ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयच्या नवीन नियमानुसार, 1 फेब्रुवारीपासून, विशेष वर्णांनी बनलेल्या यूपीआय ट्रान्झॅक्शन आयडी वापरून केलेले व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. आजपासून, फक्त अल्फान्यूमेरिक वर्ण (अक्षरे आणि संख्या) वापरून तयार केलेल्या UPI ट्रान्झॅक्शन आयडीचा वापर करूनच व्यवहार करता येतील. (हेही वाचा: Nirmala Sitharaman यांनी सादर केला Economic Survey 2025; जीडीपी 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज)

कोटक महिंद्रा बँकेचे नवीन नियम -

कोटक महिंद्रा बँकेने 1 फेब्रुवारी 2025 पासून त्यांच्या सामान्य वैशिष्ट्यांमध्ये आणि शुल्कांमध्ये बदल लागू केले आहेत. हे बदल मोफत एटीएम व्यवहार मर्यादा, डिमांड ड्राफ्ट, आरटीजीएस, आयएमपीएस, चेकबुक इत्यादी बँकिंग सेवांशी संबंधित आहेत.