LPG Cylinder (PC - Latestly File Image)

LPG Price Update: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडर (LPG cylinder)च्या किमती कमी झाल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर (Commercial Gas Cylinder)च्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. या एलपीजी सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली आहे. तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 ऑगस्ट 2024 पासून एलपीजी सिलेंडरची किंमत कायम आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थांची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि लग्नसमारंभ अशा व्यावसायिक कारणांसाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो.

व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत -

या बदलानंतर, इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आज, 1 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1797 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 1804 रुपये होती. कोलकातामध्ये या एलपीजी सिलिंडरची किंमत 1911 रुपयांवरून 1907 रुपयांवर आली आहे. आता मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1749.50 रुपयांना उपलब्ध आहे. त्याचवेळी, हे एलपीजी सिलिंडर आजपासून चेन्नईमध्ये 1959.50 रुपयांना मिळणार आहे. (हेही वाचा -Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार देशाचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कधी, कसे आणि कुठे पाहाल थेट प्रक्षेपण)

एलपीजी सिलेंडरची किंमत -

आज घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत अजूनही 14 किलोचा एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीत उपलब्ध आहे. हे सिलिंडर दिल्लीत 803 रुपयांना उपलब्ध आहे. लखनौमध्ये या एलपीजी सिलेंडरची किंमत 840.50 रुपये आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडर 802.50 मध्ये उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 818.50 रुपये आहे. दुसरीकडे, कोलकातामध्ये हा एलपीजी सिलिंडर 829 रुपयांना उपलब्ध आहे.  (हेही वाचा: Nirmala Sitharaman यांनी सादर केला Economic Survey 2025; जीडीपी 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज)

आज अर्थसंकल्प सादर होणार -

दरम्यान, आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आजच्या अर्थसंकल्पात सामान्य माणसाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.