Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार देशाचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कधी, कसे आणि कुठे पाहाल थेट प्रक्षेपण
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. दुसरा टप्पा, 10 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत चालेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) शनिवारी, म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (Budget 2025) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे देशभरातील नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी सकाळी 11 वाजता संसदेत 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकार 3.0 चा दुसरा अर्थसंकल्प असेल, ज्यामध्ये देशाची आर्थिक दिशा आणि आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारच्या योजना सादर केल्या जातील. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे बदलही होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.
अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण सकाळी 11 वाजल्यापासून पाहता येणार आहे. तुम्ही संसद टीव्हीवर (लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही) बजेट थेट पाहू शकता. याशिवाय तुम्ही indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटवरही बजेट भाषण पाहू शकता. याशिवाय तुम्ही अनेक न्यूज चॅनेलवरही बजेटचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकता.
जनतेच्या अपेक्षा-
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. दुसरा टप्पा, 10 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत चालेल. दरम्यान, यावेळी अर्थसंकल्पातून अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत. कर कपात आणि रोजगारापर्यंत प्रत्येक विभागातील लोकांकडून अनेक अपेक्षा आहेत. सध्या 10 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील कर रद्द करण्याची चर्चा आहे. यासोबतच जुनी करप्रणालीही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार नवीन करप्रणाली अधिक आकर्षक बनवू शकते, असे मानले जातदे आहे. कृषी क्षेत्राला मोठा अर्थसंकल्प दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी सरकार नवीन योजना आणू शकते. (हेही वाचा: Nirmala Sitharaman यांनी सादर केला Economic Survey 2025; जीडीपी 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज)
अर्थसंकल्प संकल्पना-
अर्थसंकल्प ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये सरकार संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा संसदेसमोर सादर करते, ज्यामध्ये उत्पन्न, खर्च आणि कर्ज या तीन मुख्य गोष्टींचा समावेश होतो. म्हणजेच गेल्या वर्षी सरकारने किती पैसा उभा केला, तो कुठे खर्च झाला आणि किती कर्ज घ्यावे लागले. अर्थसंकल्प एक आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी आणि दुसरे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी येतो. चालू आर्थिक वर्षात किती उत्पन्नाचा अंदाज येईल, कुठे आणि किती पैसे खर्च केले जातील हे देखील यात सांगितले आहे. अर्थसंकल्पाचा अर्थव्यवस्थेवर, परिणामी लोकांच्या जीवनशैलीवर लक्षणीय प्रभाव पडतो.
(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2025 12:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

