नवा बिझनेस सुरू करायचा असो किंवा असलेला बिझनेस पुन्हा थाटण्याची धडपड असो. धंदा, व्यापार म्हटलं की आर्थिक पाठबळ ही त्यामधली एक महत्त्वाची बाब आहे. अनेकदा व्यवसायामधील मुलभूत गरजा देखील पूर्ण करण्यासाठी मालकांकडे पुरेसे पैसे नसतात. अशावेळी पैशांचा एक स्त्रोत असतो तो म्हणजे बॅंकेचे कर्ज. कर्जाने पैसे घेऊन अनेकजण सध्या आपले व्यवसाय सुरू करत आहे. सरकार कडून व्यवसायामध्ये महिलांना पुढे आणण्यासाठी विशेष योजना आहेत. त्यांना खस व्याज दराने पैसे दिले जातात. मग सध्या तुम्ही देखील व्यवसायासाठी पैशांची जुळवाजूळव करत असाल तर जाणून घ्या सध्या देशातील कोणत्या खाजगी, सरकारी बॅंका किती व्याजदराने तुम्हांला कर्ज देत आहे.
भारतातील प्रमुख बॅंकेचे जाणून घ्या व्याजदर
- स्टेट बॅंक ऑफ इंडिया 11.20%- 16.30( Linked to MCLR)
- बॅंक ऑफ महाराष्ट्र 14.50% onwards
- HDFC बॅंक 15 % - 21.35%
- Axis बॅंक 15.5% onwards
- ICICI बॅंक 16% onwards
- Kotak बॅंक 16.00%
- Corporation बॅंक 13.55% onwards
- धनलक्ष्मी बॅंक- 12.90% onwards
- RBL Bank Business Loan Rates 16.25%
- IndusInd बॅंक 14.00%
अनेकदा व्यावसायिक कर्ज घेताना कर्ज देणारे रक्कमेच्या बदल्यात त्याच किंमतीची एखादी वस्तू, प्रोपर्टी गहाण ठेवतात म्हणजे कर्जाच्या रक्कमेची परतफेड न झाल्यास त्या वस्तू विकून कर्ज देणारी व्यक्ती आपलं नुकसान भरून काढू शकेल. मात्र अशाप्रकारे काही गहाण न ठेवता देखील काही कंपन्या कर्ज देतात पण त्यांचे व्याजदर हे फार जास्त असतात. बिझनेस साठी 100% कर्ज दिले जात नाही. एकूण रक्कमेच्या काही % रक्कमच केवळ कर्ज म्हणून मिळू शकते. त्यामुळे व्यवसायात उडी टाकतात हे आर्थिक व्यवहार तपासून पहा. कागदपत्र नीट वाचूनच कर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.