Fake Currency Alert: 50 आणि 200 च्या बनावट नोटांविरोधात RBI चा सतर्कतेचा इशारा; जाणून घ्या कशा ओळखाल खोट्या नोटा
Indian currency notes (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

बनावट नोटा चलनात (Fake Currency Notes) आल्याचे प्रमाण वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सर्वसामान्य नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, Apex Bank कडून आर्थिक जागरूकता सप्ताह (Financial Awareness Week) साजरा करण्यात येतो. त्यावळेस बँकेचे रिजनल डिरेक्टर लक्ष्मीकांत राव (Laxmikant Rao) यांनी खोट्या नोटा ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या. त्याचबरोबर खोट्या नोटांप्रकरणी किंवा इतर कोणत्याही समस्येप्रकरणी ग्राहक बँकेकडे तक्रार दाखल करु शकतात. अशा प्रकराच्या तक्रारी लोकपाल येथे दाखल करण्यासाठी ग्राहक https://cms.rbi.org.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. (Fact Check: मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची RBI ची घोषणा? PIB ने केला खुलासा)

खोट्या आणि खऱ्या नोटांमध्ये फरक सांगणारे काही फिचर्स:

# महात्मा गांधींचे चित्र मध्यभागी असते.

# नोटेवरील 50 आकड्यावरुन तुम्ही आरपार पाहू शकता.

# नोटेवरील आकडे हे देवनागरी लिपीत लिहिलेले असतील.

# ‘RBI’, ‘भारत’, ‘INDIA’ आणि ‘50’ हे अगदी लहान अक्षरात लिहिलेले असेल.

# 'भारत' आणि 'RBI' हे नोटेच्या सिक्युरिटी थ्रेडमध्ये लिहिलेले असेल.

# महात्मा गांधींच्या फोटोच्या उजव्या बाजूला ग्रॅरंटी क्लॉज, राज्यपालांची स्वाक्षरी आणि प्रॉमिस क्लॉज लिहिलेला असेल.

# नोटेच्या मागे उजव्या बाजूस अशोकस्तंभ असेल.

# नोटेवर लिहिलेले सिरीयल नंबर हे छोट्यापासून मोठ्या आकारात वाढत जातील.

# नोटेच्या मागे डाव्या बाजूस नोट छापलेले वर्ष लिहिले असेल.

# नोटेवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आणि घोषवाक्य असेल.

अधिक किंमतीच्या नोटांबाबतीत लोक आता अधिक सतर्क झाले आहेत. त्यामुळे फसवणूक करणारे आता 50, 100, 200 अशा कमी किंमतीच्या नोटांकडे वळले आहेत. त्यामुळे या नोटा खऱ्या आहेत की बनावट हे तपासून पाहणे गरजेचे आहे. तसंच खोटी नाोट सापडल्यास त्या व्यक्तीने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.