Fact Check: मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची RBI ची घोषणा? PIB ने केला खुलासा
Fake News | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही दिवसांपासून चलनातील काही नोटा बाद होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यासंदर्भातील एक मेसेजही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात असे म्हटले आहे की, आरबीआयच्या (RBI) सूचनेनुसार, मार्च 2021 नंतर 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी. मीना यांना सांगितले की, बँक या चलनातील जुना नोटा आर्थिक व्यवहारातून काढून टाकण्याच्या विचारात आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड गैरसमज निर्माण झाला. विशेष म्हणजे यासंदर्भातील अनेक अफवा देखील पसरत आहेत. त्यामुळे पीआयबीने (PIB) यामागील सत्याचा उलघडा केला आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटच्या माध्यमातून हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हा दावा फेक असून अशी कोणतीही घोषणा आरबीआयकडून करण्यात आलेली नाही." (मार्चमध्ये चलनातून बाद होणार 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा? जाणून घ्या म्हणाले RBI)

Fact Check By PIB:

गेल्या आठवड्यात आलेल्या काही मीडिया रिपोर्ट्सनुसार बहुतांश लोक नाण्यांचा स्वीकार करत नाहीत. 10 रुपयांचे नाणे चलना आणून 15 वर्ष झाली असली तरीही ट्रेडर आणि व्यापारी या नाण्यांचा स्वीकार करत नसल्याने आरबीआय आणि बँकांसमोर एक समस्या उभी राहीली आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील अशाप्रकारच्या अनेक फेक न्यूज नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.