'रात्रीस खेळ चाले 2’ मधील वच्छीचा 'नागिन डान्स' व्हायरल, तुम्ही पाहिलात का? (Watch Video)
Actress Sanjivani Patil (Photo Credits: Facebook)

झी मराठी वरून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मालवणच्या मातीतली मालिका म्हणजेच रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) . सध्या मालिकेचं दुसरं पर्व सुरु असून या आधीच्या पर्वात दाखवलेल्या घटनांचे गूढ उकलले जात आहे. मालिकेतील सर्वच पात्र म्हणजे दमदार व्हिलन अण्णा, शेवंता, इंदू, दत्ता, सरिता, शोभा रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. पण या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती विशेष भाव खाऊन जाते ती म्हणजे वच्छी. अण्णाला धडा शिकवण्यासाठी ही वच्छी नेहमीच काही ना काही हटके फंडे वापरताना दिसून येते. मालिकेतील तिच्या दमदार पात्राएवढाच तिचा डान्स (Vacchi Dance)  देखील गाजला होता. आपल्या मुलाच्या वरातीत नाचताना अण्णाला शिव्याशाप देणारा डान्स मालिकेतील वच्छी म्हणजे अभिनेत्री संजीवनी पाटील (Sanjivani Patil) यांना चांगलीच फेम देऊन गेला. त्याच प्रमाणे आता संजीवनी यांचा नागीण डान्स देखील सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

टिक टॉक वरून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ मध्ये संजीवनी या नागीण डान्स करताना पाहायला मिळत आहेत. कोणत्याही कोरिओग्राफर शिवाय केलेला त्यांचा मालिकेतला डान्स तुफान हिट झाला होता.या डान्समुळे प्रेक्षकांनी वच्छीच्या भूमिकेला डोक्यावर उचलून घेतलं होतं.'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादा ची होणार एक्झिट? समोर आला नवा प्रोमो

वच्छीचा नागीण डान्स ( Watch Video)

हे ही वाचा - Bigg Boss Marathi 2, 21 June, Episode 27 Updates: धोबीपछाड कार्यातील प्रचंड गदारोळानंतर विजेती ठरली टीम B; तर कॅप्टनसी पदाचे उमेदवार म्हणून घरातील 'या' सदस्यांची निवड

सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. काही दिवसांपूर्वी वच्छीचा मुलगा कशी याला गावकऱ्यांनी मिळून दगडाने ठेचून मारले होते ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे अण्णाची सून सरिता ही गरोदर होती. कालच्या भागात सरिताच्या पोटी मुलाचा जन्म होतो त्यामुळे पूर्ण गावात काशीने सरिताच्या पोटी पुनर्जन्म घेतल्याची बातमी पसरते.आता येत्या दिवसात या बाळाला अण्णा स्वीकारणार का की यावरून वेगळाच काही ट्विस्ट आणला जाणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.