Bigg Boss Marathi 2, 21 June, Episode 27 Updates: धोबीपछाड कार्यातील प्रचंड गदारोळानंतर विजेती ठरली टीम B; तर कॅप्टनसी पदाचे उमेदवार म्हणून घरातील 'या' सदस्यांची निवड
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

Bigg Boss Marathi 2 Day 26 Episode: बिग बॉस मराठी 2 च्या घरात आज छोबीपछाड या साप्ताहिक कार्यावरुन पुन्हा एकदा वाद विवाद होताना दिसले. छोबीपछाड कार्याच्या तिसऱ्या राऊंडमध्ये टीम ए कडे सात कपडे तयार होते. मात्र ते अप्रुव्ह झाले नव्हते. तर टीम ए कडे एकही कपडा तयार नव्हता. त्यामुळे कोणतीच टीम या राऊंडमध्ये विजेती ठरली नाही. चौथ्या राऊंडमध्येही दोन्ही टीम्स 3 कपड्यांची ऑर्डर पूर्ण करु न शकल्याने या राऊंडमध्ये दोन्ही टीम्स अयशस्वी झाल्या. त्यामुळे या साप्ताहिक कार्यात दुसऱ्या राऊंडमध्ये जिंकलेली टीम बी विजेती ठरली. (Bigg Boss Marathi 2 स्पर्धक अभिजित बिचुकले यांना 'बिग बॉस' च्या घरातून अटक; चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात)

त्याचबरोबर आज बिग बॉसने कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्याची जबाबदारी प्रथम विजेती टीम बी वर सोपवली आणि त्यानंतर टीम ए ला देखील विजेत्या टीम बी मधील कॅप्टन पदासाठी उमेदवार निवडण्याची संधी देण्यात आली. हा निर्णय सर्वानुमते घेण्याचे आदेशही देण्यात आले. या आदेशानुसार टीम बी ने कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी शिवची निवड केली. तर टीम ए ने किशोरी शहाणे यांची निवड केली. त्यामुळे आता कॅप्टनसी कार्य हे या दोन उमेदवारांमध्ये रंगणार आहे.

विशेष म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये रुपालीने बिचुकले यांना नवे नाव दिले. सर्वजण बिचुकलेंना AB असे म्हणतात. तर त्यांचे दादा हे टोपणनावही प्रसिद्ध आहे. मात्र इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आणि हटके करत रुपालीने आपल्या खास अंदाजात बिचुकले यांना 'बिट्स' हे नाव दिले.