Bigg Boss Marathi 2 स्पर्धक अभिजित बिचुकले यांना 'बिग बॉस' च्या घरातून अटक; चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात
Abhijeet Bichukale | (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरातील चर्चित स्पर्धक अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांना अटक करण्यात आली आहे. सातार्‍यातील चेक बाऊंस प्रकरणी आरे कॉलनी पोलिसांच्या मदतीने ही करावाई केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सातारा पोलिस बिग बॉस मराठी 2 च्या गेटवर पोहचले असून बिचुकले पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती एबीपी माझा वृत्त वाहिनीने दिली आहे. यंदाच्या आठवड्यात अभिजित बिचुकले  हा स्पर्धक नॉमिनेशनमध्ये  होते. त्यामुळे घरातून आऊट होणारा सदस्य हाच होता का? याबाबतची माहिती लवकरच दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी आजारपणाचं कारण देत शिवानी सुर्वे देखील घराबाहेर पडली आहे. त्यामुळे सलग दोन आठवड्यांमध्ये ही बिग बॉसच्या घरातील ही दुसरी मोठी एक्झिट आहे. खासदार उदयनराजे भोसले ही ज्याला घाबरतात, असा 'बिग बॉस मराठी 2' चा स्पर्धक अभिजीत बिचकुले नेमका आहे तरी कोण?

बिग बॉस मराठी 2 च्या घरात प्रवेश केल्यापासून वादग्रस्त विधान, अपशब्दांचा सतत वापर करणं, महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं यावरून अभिजीत बिचुकले चर्चेत आले होते. शोचे होस्ट महेश मांजरेकरांनी त्यांना वारंवार ताकीद दिली होती. Bigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकले यांना बिग बॉस च्या घराबाहेर काढण्यासाठी भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

अभिजीत बिचुकले हे कवी आणि राजकारणी आहेत. महाराष्ट्रात त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं आहे. अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. यापूर्वी राष्ट्रपतीपद भूषवण्यासाठी प्रयत्न केले होते. सातार्‍यात त्यांनी खासदार उदयन राजे भोसले यांना अनेकदा आव्हान दिले आहे.