Shivani Surve ( Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठी 2 च्या घरातून शिवानी सुर्वेची (Shivani Surve)  महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) शाळा घेऊन मागील आठवड्याच्या 'विकेंडचा डाव' भागात हाकालपट्टी केली. मात्र घराबाहेर पडूनही शिवानीने मीडियात कुठेच प्रतिक्रिया न दिल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आता ती काय करणार? कुठे दिसणार? असे अनेक प्रश्न आले होते. मात्र टाईम्स ऑफ इंडिया ला खास मुलाखत देताना तिनं 'आजारातून बाहेर पडली तर बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री घ्यायला आवडेल. असं तिनं म्हटल्याने आता अनेकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. बिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण? (Photos)

शिवानी सुर्वेने घरात असताना वारंवार तिला Claustrophobia म्हणजे बंद ठिकाणी राहताना विकृत भीती वाटणं हा त्रास असल्याचा उल्लेख केला होता. या आजाराचं कारण देत तिने अनेकदा खेळातून माघार घेतली. घरातील सदस्यांसोबत वाद घातले. मात्र बिग बॉसच्या घराचे नियम धाब्यावर बसवत तिने घर सोडण्याची आणि कायदेशीर कारवाईची धमकी दिल्यानंतर मात्र तिला बिग बॉसने बाहेरचा रस्स्ता दाखवला आहे.

घराबाहेर पडल्यावर शिवानी सध्या उपचार घेत असून दिवसेंदिवस तिची प्रकृती सुधारत आहे. असे तिने TOI सोबत बोलताना खास मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. तसंच या आजाराचा अडथळा नसता तर नक्कीच बिग बॉस 2 चं विजेतेपद जिंकलं असतं असा विश्वास तिने बोलून दाखवला आहे. शिवानीची घरातून एक्झिट केल्यानंतर त्याच क्षणीच घरात हीना पांचाळ या पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची घरात एन्ट्री झाली आहे. आता हा खेळ हीनाच्या एन्ट्रीमुळे अधिकच चर्चेमध्ये आला आहे.