Heena Panchal (Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठी 2 (Big Boss Marathi 2) मधील स्पर्धकांच्या राडे, भांडणांनी बिग बॉसचे घर अगदी दणाणून सोडलं आहेत. त्यात गैरवर्तुकीमुळे बिग बॉसने घराबाहेर काढलेली शिवानी सुर्वे (Shivani Surve) जितकी प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली तितकीच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्डवर आलेली अभिनेत्री हीना पांचाळ (Heena Panchal) ही देखील तितकीच लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

उत्कृष्ट नृत्यांगना असलेली हीना ने अनेक आयटम साँग केले आहेत. तर अलीकडेच तिने '31 दिवस' या चित्रपटात 'काय काय सांगू तुला ग बाई' या गाण्यावर नृत्य केले आहे.

हीना आपल्या नृत्यामुळे जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे. ती बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सारखी दिसते असे अनेकजणांनी तिला सांगितले असून खुद्द मलायकाही तसेच वाटते, असे तिने महेश मांजरेकरांना सांगितले. मात्र ती मलायका सारखी नुसती दिसत नसून ती ही तिच्याच इतकी हॉट आणि बोल्ड आहे.

अशी ही बोल्ड अभिनेत्री मंगळवारच्या भागात अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) यांची पाठीचा मसाज करताना दिसली. ते बघून सर्व प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. बिग बॉस मराठी 2 शो दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट घेत असताना हीना ची एन्ट्री देखील या शो मध्ये एक वेगळा ट्विस्ट असू शकतो.

हेही वाचा- Bigg Boss Marathi 2, 18 June, Episode 24 Updates: 'शेरास सव्वा शेर' टास्कमध्ये जोरदार वादावादी; वीणा जगताप, पराग कान्हेरे, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर आणि अभिजीत बिचुकले झाले नॉमिनेट

ग्रँड फिनालेपर्यंत कोण पोहोचलं असं वाटतं असा प्रश्न महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) हीनाला विचारला, त्यावर ती म्हणाली, ‘अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे हे दोघं मला स्टेजवर घेऊन येत असल्याचं स्वप्न पडलं’. म्हणजेच पराग, अभिजीत तिच्यासोबत अंतिम फेरीत असतील असे तिने सांगितले.

तिचे हे विधान तिला कितपत फायद्याचे ठरते की धोक्याचे हे येणा-या काही दिवसांत कळेलच.