बिग बॉस (Bigg Boss) हा रिअॅलिटी शो जागतिक स्तरावर चर्चेमध्ये असलेला एक खेळ आहे. सध्या मराठीमध्ये या रिएलिटी शोचं दुसरं पर्व रंगत आहे. 15 स्पर्धकांसह 26 मे पासून बिग बॉस मराठी 2 ला सुरूवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवसापासून या खेळामध्ये वाद, गॉसिप्स, भांडणं, कुट्नीती याची प्रचिती रसिकांना येत आहे. स्पर्धकांचा विचार करता 'शिवानी सुर्वे'(Shivani Surve) ,'अभिजीत बिचुकले'(Abhijeet Bichukale), 'पराग कान्हेरे' (Parag Kanhere) ही नावं यंदाच्या पर्वात सध्या खूपच चर्चेमध्ये आहेत.
बिग बॉस मराठी 2 च्या खेळाला 15 दिवस होतायत ना होतात 'शिवानी सुर्वे' या तगड्या अभिनेत्री स्पर्धकाने घराबाहेर पडण्याचा हट्ट केला आहे. कायदेशीर लढाई झाली तरी चालेल मला घराबाहेर पडायचं असं म्हणत गेले काही दिवस शिवानी बिग बॉसच्या घराचे नियम धाब्यवर बसवत आहे. काल (12जून) दिवशी शो मध्ये पहिल्यांदा तिच्या तोंडात 'अजिंक्य' हे नाव आलं. आणि हा अजिंक्य नेमका कोण? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला.
सुरूवातीच्या काही एपिसोडमध्ये सातार्याच्या अभिजित बिचुकलेंसोबत पंगा घेताना मी लग्नानंतर लवकरच सातारची होणार आहे. असं शिवानी म्हणाली होती. पण ती कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे? याबाबत मात्र तिने कटाक्षाने बोलणं टाळलं. मात्र मागील काही दिवसांपासून मानसिकरित्या ढासळलेल्या शिवानीने मन मोकळं करताना 'अजिंक्य' हे नावं घेतलं.
शिवानीचा बॉयफ्रेंड अजिंक्य म्हणजे नेमका कोण?
-
- शिवानी सुर्वे ही अजिंक्य ननावरे या अभिनेता, फोटोग्राफर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अजिंक्य आणि शिवानीचे काही फोटो त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
- शिवानी आणि अजिंक्य हे दोघेही कलाकार आहेत. टाईम्स ऑफ इंडियासोबत एक्झक्लुझिव्ह गप्पा मारताना शिवानी आणि आपली भेट पहिल्यांदा तू जीवाला गुंतवावे मालिकेच्या सेटवर झाल्याची माहिती त्याने दिली आहे.
- अजिंक्य हा 'तू जीवाला गुंतवावे', 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला','सख्या रे', 'गर्ल्स होस्टल' या मालिकांमधून रसिकांच्या भेटीला आला आहे.
- दिग्पाल लांजेकरच्या 'हे मृत्युंजय' या नाटकामध्ये वीर सावरकर हे मध्यवर्ती पात्रदेखील अजिंक्यने साकारले आहे.
- प्रताप फडच्या 'अनन्या' या नाटकातही अजिंक्य महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
शिवानी बिग बॉसच्या घरात उत्तम खेळेल असा विश्वास त्याने TOI कडे बोलून दाखवला आहे. राग नियंत्रणात ठेव असा सलग दोन आठवड्यात शोचे होस्ट महेश मांजरेकरांनी शिवानीला ताकीद दिली आहे. आता यंदाच्या विकेंडचा डाव मध्ये नेमकं काय होतं? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.