abhjeet bichkule (Photo Credits: Twitter)

अवघा महाराष्ट्र ज्या मराठी रिअॅलिटी शो ची वाट पाहत होता तो 'मराठी बिग बॉस 2' (Big Boss Marathi 2)अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रविवारी ह्या शो चा ग्रँड प्रिमिअर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. अनेक अनपेक्षित तर काही अपेक्षित अशा स्पर्धकांची ह्या शो मध्ये एन्ट्री झाली. ह्या अनेक मराठी सिनेसृष्टीतील मालिका तसेच नाटकातील अनेक दिग्गज कलाकार ह्या शोमध्ये सहभागी झाले असले तरीही ह्या सर्वांमध्ये एक नाव चर्चेत राहिले ते कविमनाचा नेता अभिजीत बिचकुले (Abhijeet Bichkule) याचे. त्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताच सर्वच स्पर्धकांनी नाकच मुरडली असंच रविवारच्या भागात पाहायला मिळाला. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे हा अवलिया?

कोण आहे हा अभिजीत बिचकुले? 

साता-यामध्ये कवीमनाचे नेते म्हणून सुप्रसिद्ध नेते AB अर्थात अभिजीत बिचकुलेनी आजपर्यंत राजकारणातील अनेक धुरंधर नेत्यांना आव्हान दिलय. लोकशाहीतील अशी कोणतीच निवडणूक नाही, जिथे बिचकुलेंनी फॉर्म भरला नसेल. नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्नींची शर्थ केली. इतकच नव्हे तर त्याने पंतप्रधान मोदींनाही पत्र पाठवून साकडं घातलं होते. राजकारणातील नेत्यांना आव्हान देणा-या ह्या अभिजीत बिचकुलेंना दुसरं तिसरं कोणी नाही तर जे भल्याभल्यांची बोलती बंद करतात असे तडफदार व्यक्तिमत्व असणारे खासदार उदयनराजे भोसलेही देखील घाबरतात. साता-यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी कबूलही केले होते. त्यानंतर मात्र सर्व लोक देखील अचंबित झाले होते.

Bigg Boss Marathi 2 Final Contestants List: सुरेखा पुणेकर, अभिजीत बिचुकले सह 15 सेलिब्रिटी स्पर्धकांची 'बिग बॉस मराठी' च्या घरात झाली दमदार एन्ट्री;100 दिवस रंगणार खेळ

 कवीमनाचा अभिजीत बिचकुले:

अभिजीत बिचकुले याने आतापर्यंत अनेक निवडणुका लढल्या पण त्यांना कोणत्याच निवडणुकीत यश आले नाही हा भाग वेगळा. मात्र तरीही त्याने हार न मानता आपले प्रयत्न चालूच ठेवले. इतकच नव्हे तर 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार, असं धडधडीत वक्तव्य देखील त्याने केले होते. त्याने बरेच सामाजिक कार्य देखील केले. तसेच कविता बनविण्याचा छंद मनाशी बाळगून त्यांनी अनेक कविता तसेच गाणी लिहिली तसेच गायलीही. त्याची एक झलक खाली पाहा..

अशा या अवलियाचे बिग बॉस मराठी 2 च्या घरात आगमन तर दिमाखात झाले. मात्र त्याला पाहताच किंवा त्याच्या बरोबर झालेल्या पहिल्या भेटीत अनेक स्पर्धकांनी नाकं मुरडली. कदाचित त्याचे बोलणे अथवा बोलण्याची पद्धत आवडली नसावी. मात्र एकंदरीतच त्याचा घरातील वावर बघता हा घरात धमाल करणार आणि स्पर्धकांना वेडं करुन सोडणार हे मात्र नक्की.

 बिग बॉस मराठी 2 च्या घरातील 15 स्पर्धक कोण? 

मराठी बिग बॉस 2 चे असे अनेक धमाल किस्से ऐकण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.