Bigg Boss Marathi 2 Final Contestants List: सुरेखा पुणेकर, अभिजीत बिचुकले सह 15 सेलिब्रिटी स्पर्धकांची 'बिग बॉस मराठी' च्या घरात झाली दमदार एन्ट्री;100 दिवस रंगणार खेळ
Bigg Boss Marathi 2 Final Contestants List (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi) चाहते ज्या दिवसाची मागील कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते तो बिग बॉस मराठी 2 चा खेळ आता सुरू झाला आहे. बिग बॉस मराठी 2 चा टीझर आणि प्रोमो आल्यापासूनच सोशल मीडियामध्ये अनेक सेलिब्रिटी स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र अखेर आज या खेळात कोण कोण सहभागी होणार याचा उलगडा झाला आहे. दुसर्‍या पर्वातही अभिनेते,दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सूत्रसंंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मग पहा यंदाच्या पर्वात बिग बॉस मराठी स्पर्धक म्हणून कोणाकोणची एन्ट्री झाली आहे.

 बिग बॉस मराठी 2 पर्वाचे स्पर्धक कोण?  

सुरेखा पुणेकर, वैशाली भैसने माडे, अभिजीत बिचुकले, किशोरी शहाणे विज, शेफ पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, माधवी जुवेकर, रूपाली भोसले, माधव देवचक्के, विद्याधर जोशी, शिवानी सुर्वे, शिवा ठाकरे, वीणा जगताप, नेेेेहा शितोळे, दिगंबर नाईक अशा 15 सेलिब्रिटींची घरात एन्ट्री झाली आहे. पहा  बिग बॉस मराठी 2 पर्वाच्या ग्रॅन्ड सोहळ्याचे लाईव्ह अपडेट्स

बिग बॉस मराठी 1 च्या पर्वाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे अनेकांना बिग बॉस मराठी 2 च्या पर्वाची प्रतिक्षा होती. पहिलंं पर्व अभिनेत्री आणि निर्माती मेघा धाडे हिने जिंकलं होतं. त्यानंतर तिने हिंदी बिग बॉसमध्येही आपलं नशिब आजमावलं, मात्र ती तो शो जिंकू शकली नव्हती. आता बिग बॉस मराठी 2 च्या पर्वात काय काय होतं हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कलर्स मराठीवर सुरू झालेला हा रिएलिटी शो रोज रात्री 9.30 वाजता टेलिव्हिजनवर  पाहता येईल. तसेच वर ऑनलाईन माध्यमातून हा शो पाहता येऊ शकतो.