गायक, अभिनेता अभिजित केळकर याचा बिग बॉस मराठी २ च्या घरात प्रवेश  झाला आहे. अनेक रिएलिटी शो मध्ये सहभागी झाला होता. 

माधव देवचक्के आणि रुपाली भोसले यांची बिग बॉस मराठी 2 च्या घरात एन्ट्री झाली आहे. माधव 'सरस्वती' मालिकेमधून रसिकांच्या भेटीला आला होता. स्पेशल चाईल्डची त्याने साकारलेली भूमिका विशेष लक्षात राहणारी आहे. रूपाली भोसले ही मराठमोळी कलाकार 'बडे दूर से आए हे' हिंदी मालिकांमधून रसिकांच्या भेटीला आली आहे. यापुर्वी मराठी सिरिअल्स, सिनेमा मधून ती रसिकांच्या भेटीला आली होती. 

अभिनेत्री मैथिली जावकर ची बिग बॉस मराठी 2 च्या घरात

Blind Fold cooking चा बादशाह अशी ओळख असणारा शेफ पराग कान्हेरे याने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. त्याच्या नावावर 3 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. अनेक कुकिंग शो मधून पराग रसिकांच्या भेटीला आला होता.

महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात हमखास दिसणारा एक चेहरा म्हणजे विद्याधर जोशी. आता तोच चेहरा बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. खलनायक साकारणारा विद्याधर जोशी बिग बॉसच्या घरात किती दंगा घालणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठी २ च्या प्रोमोमध्ये एक लावण्यवती यंदा स्पर्धक म्हणून एन्ट्री करणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. ती स्पर्धक सुरेखा पुणेकर आहे. ठसकेबाज लावणी कलाकार ते राजकारणातील प्रवेश यामुळे अनेकदा चर्चेमध्ये असलेल्या सुरेखा पुणेकर यांचा धमाका पाहायला मिळणार आहे.

MTV वरील  Roadies शो मधून युथ आयकॉन ठरलेला शिवा  ठाकरे याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.

मराठी मालिकांपासून सुरुवात केलेली शिवानी सुर्वे हिने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे.

महाराष्ट्राची  राजगायिका, 'पिंगा गर्ल' वैशाली भैसने माडे हीची बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झाली आहे. अनेक रिएलिटी शो मधून पुढे आलेली वैशाली आता बिग बॉसच्या घरात काय करणार? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. 

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेची मुख्य नायिका वीणा जगतापने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. ही मालिका काही दिवसांपूर्वी संपली. त्यामुळे या मालिकेतील कलाकार बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार ही चर्चा रंगली होती.

Load More

Bigg Boss Marathi 2 Final Contestants List: बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi)  सीझनला आजपासून (26 मे) सुरूवात होणार आहे. जगभरात चर्चित असलेला हा रिअ‍ॅलिटी शो आता मराठीमध्येही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. पहिल्या यशस्वी पर्वानंतर रसिकांना सीझन 2 ची उत्सुकता होती.बिग बॉस 2 चा टीझर समोर आल्यापासूनच आता यंदा कोणकोणते सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार याबाबत रसिकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. आज बिग बॉस मराठी सीझन 2 चे होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) त्यांच्या खास अंदाजात स्पर्धकांची ओळख करून देणार आहेत. कलर्स मराठीवर आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून याचा ग्रॅंड प्रिमियर (BBM2 Grand Premiere) सोहळा सुरू होणार आहे. Bigg Boss Marathi Season 2: 'बिग बॉस'च्या यंदाच्या पर्वात स्पर्धकांना शहरी- ग्रामीण विभागाच्या जीवनाचा आनंद घेता घेणार?

बिग बॉस मराठी 2 च्या 3 प्रोमोनुसार, यंदा बिग बॉसच्या घरात एक लावण्यवती, एक राजकारणी आणि एक कीर्तनकार यांची एन्ट्री होणार आहे.त्यामुळे सुरेखा पुणेकर, अविनाश बिचुकले यांची नावं चर्चेत आहेत. मात्र यंदा घरात कोणकोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रवेेश करणार हे स्पष्ट होणार आहे. बिग बॉस मराठी 2 ची थीम काय असेल? याबाबतही खुलासा होणार आहे.

बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो टीव्हीवर कलर्स मराठीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  तर ऑनलाईन स्वरूपात पाहण्यासाठी वूट (VOOT) हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवरून तुम्हांला डाऊनलोड करावं लागेल. त्यावर रोजचे एपिसोड्स आणि सोबतच अनसिन गंमतीजंमतीदेखील पहायला मिळणार आहेत. बिग बॉस मराठी 1 ची विजेती निर्माती, अभिनेत्री मेघा धाडे ठरली होती.