Bigg Boss Marathi 2 Promo 3: अनेकांना संयमांची वाट दाखवणारी ‘ही’ कोण व्यक्ती करणार बिग बॉसच्या घरात प्रवेश (Watch Video)
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Twitter)

BBM2 Promo 3: बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) ची घोषणा झाल्या पासूनच यंदा  बिग बॉसच्या घरात कोण्कोणते सेलिब्रिटी सहभाग घेणार? यावरून चर्चा रंगली आहे. लवकरच बिग बॉस 2 हे पर्व सुरू होणार आहे. मात्र सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करणार? याचे संकेत देणारे प्रोमो शेअर केले जात आहेत. आज शेअर करण्यात आलेल्या तिसर्‍या प्रोमोमध्ये इतरांना संयम शिकवणारे स्वतः टिकणार का? बिस बॉसच्या घरात? असं म्हणत खास प्रोमो शेअर  करण्यात आला आहे. Bigg Boss Marathi Season 2: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मराठी बिग बॉस सिझन 2; पाहा टीझर

बिग बॉस मराठी 2 प्रोमो तिसरा

बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्या प्रोमोमध्ये राजकारणी, दुसर्‍या प्रोमो मध्ये लावणी कलाकार आणि आता तिसर्‍या प्रोमोमध्ये किर्तनकार दाखवण्यात आले आहेत. एका मंदिर परिसरात बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर कीर्तनामध्ये बसले आहेत. प्रोमो शेअर केलेल्या ट्विटमध्ये मंगलमय विचारांचा हे करतात पुरस्कार पण बिग बॉसच्या घरातलं वातावरण या स्पर्धकामुळे होणार का मंगलमय? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसर्‍या पर्वाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. हे पर्व लवकरच कलर्स मराठीवर सुरू होणार आहे.