Bigg Boss Marathi 2 First Promo: यंदा बिग बॉस मराठी 2 च्या घरात राजकारणी घेणार स्पर्धक म्हणून एन्ट्री? (Watch Video)
BBM 2 First Promo (Photo Credits: Twitter)

BBM 2 First Promo: बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना यंदा बिग बॉसच्या घरात कोणाकोणाचा समावेश असणार याची उत्सुकता लागली होती. आज शोचे होस्ट महेश मांजरेकरांनी बिग बॉस मराठी 2 चा पहिला प्रोमो (Bigg Boss Marathi 2  Promo) शेअर करत त्याची हिंट दिली आहे. राजकीय प्रचाराची धामधूम यंदा बिग बॉसच्याही घरात दिसणार आहे. खुद्द महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) राजकारण्याच्या वेषात पहायला मिळाले आहेत.

बिग बॉस मराठी 2 चा पहिला प्रोमो 

बिग  बॉस मराठी 2 च्या पहिल्या प्रोमोनुसार यंदा  घरात राजकारणातील एखादी व्यक्ती दिसणार अशी शक्यता वाढली आहे. आता ही व्यक्ती कोण असेल ? याचा अंदाज रसिक लावतीलच पण लवकरच हे नाव कोण असेल याचा उलगडा होणार आहे. "शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का #BiggBossMarathi2 च्या घरात वर्दी? "असा प्रश्न मांजरेकरांनी रसिकांना विचारला आहे.

2008 साली हिंदीच्या बिग बॉस पर्वात रिपाईच्या रामदास आठवले यांना डावलल्याने वाद रंगला होता. आता मराठी बिग बॉसच्या यंदाचे पर्वात त्यांची इच्छा पूर्ण होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  Bigg Boss Marathi Season 2: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मराठी बिग बॉस सिझन 2; पाहा टीझर

बिग बॉस मराठी 2 ची घोषणा झाल्यापासून यंदाच्या पर्वात कोण कोणते सेलिब्रिटी झळकतील याचा अंदाज आणि चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियामध्ये रंगत आहेत. यामध्ये  माझ्या नवर्‍याची बायको फेम रसिका सुनील पासून राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील कलाकारांची नावं चर्चेमध्ये आहेत. लवकरच कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी 2 हे नवं पर्व रंगायला सुरूवात होणार आहे.