Bigg Boss Marathi Season 2: 'शनाया' फेम रसिका सुनील  बिग बॉस 2 च्या घरात?
BBM 2 (Photo Credits: Instagram)

Bigg Boss Marathi Season 2: हिंदीनंतर मराठीमध्ये बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर आता दुसरा सीझन (Bigg Boss Marathi)  घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी रात्री बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या सीझनचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. अद्याप बिग बॉस सीझन 2 ची तारीख, होस्ट याबाबत खुलासा करण्यात आला नसला तरीही टीझर पाहून बिग बॉस मराठीच्या फॅन्समध्ये उत्सुकता वाढली आहे. दुसर्‍या पर्वामध्ये कोणाकोणाचा समावेश होणार याबाबत सध्या सोशल मीडियामध्ये तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे रसिका सुनील (Rasika Sunil).

रसिका सुनील

 

View this post on Instagram

 

PC: @saneshashank

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

माझ्या नवर्‍याची बायको फेम 'शनाया' म्हणजे रसिका सुनील सध्या अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी गेली असली तरीही लवकरच 'बिग बॉस सीझन 2' साठी ती भारतामध्ये परतू शकते. काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम लाईव्हमध्ये रसिकांशी बोलताना रसिकाने याबाबतचे संकेत दिले होते. तसेच टाईम्स ऑफ इंडियाशी खास मुलाखतीमध्ये बोलताना बिग बॉस साठी रसिकाला विचारण्यात आल्याची माहिती तिने कबुल केली आहे. मात्र सध्या अमेरिकेतच वास्तव्यास राहून काही हॉलिवूड प्रोजेक्टसाठी ऑडिशन देणार असल्याचा तिचा संकल्प रसिकाने बोलून दाखवला आहे. रसिका अमेरिकेत  असल्याने तिचा सध्या भारतामध्ये येण्याचा प्लॅन नाही, असे तिने स्पष्ट केले असले तरीही बिग बॉसची लोकप्रियता पाहता कधीही काहीही होऊ शकतं.   भारसिका परतल्यानंतर वाईल्ड कार्डच्या स्वरूपातही तिची उशिरा एंट्री होऊ शकते.  Bigg Boss Marathi Season 2: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मराठी बिग बॉस सिझन 2; पाहा टीझर

माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेत रसिकाने साकारलेले 'शनाया' हे पात्र खूपच लोकप्रिय झालं होतं. मात्र या मालिकेदरम्यान शिक्षणासाठी रसिका परदेशात गेल्याने तिच्याजागी आता ईशा केसकर हे पात्र साकारते. रसिकासोबतच बिग बॉसच्या घरात किशोरी आंबिये, अमिता खोपकर, मिलिंद शिंदे आदी कलाकारांची नावं चर्चेमध्ये आहेत. बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व मेघा धाडेने जिंकलं होतं. त्यानंतर तिने हिंदीच्या बिग बॉस 12 मध्येही प्रवेश मिळवला होता मात्र वाईल्ड कार्डच्या स्वरूपात गेलेली मेघा हिंदी पर्वात अंतिम टप्प्यपर्यंत पोहचू शकली नाही.