Bigg Boss Marathi Season 2: ..तर मंडळी, मराठी दूरचित्रवाणी पडद्यावरील सर्वात वादग्रस्त म्हणून ओळख असलेला मराठी रिअॅलिटी शो अर्थातच बिग बॉस मराठी सीझन 2 (Bigg Boss Marathi Season 2) प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे. हिंदी दूरचित्रवाणी (Television) पडदा व्यापल्यानंर बिग बॉस (Bigg Boss) भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमधून सुरु झाला. मराठीतही हा शो गेल्यावर्षीपासून सुरु झाला. या शोने अल्पावधीतच मराठी दुरचित्रवाणीचा पडदा व्यापत आपला खास असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. विशेष म्हणजे मराठी बिग बॉस सीझन 1 (Bigg Boss Marathi Season 1) हा केवळ मराठीतच नव्हे तर, इतर भाषक प्रेक्षांमध्येही उत्सुकता निर्माण करणारा ठरला. खास करुन गुजराती प्रेक्षक (Gujarati Audience) आणि हिंदी भाषक प्रेक्षकांनीही (Hindi Audience) मराठी बिग बॉसला पसंती दिली. आता हा शो सीझन 2 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या शोचा टीझरही नुकताच लॉन्च झाला आहे. मात्र, या टीझरमध्ये केवळ नावापलीकडे पाहण्यासारखे विशेष असे काहीच नाही. त्यामुळे उत्सुकता वगळता हा टीझर काहीही देत नाही. तरीही तुम्हाला हा टीझर पाहायचा असल्यास खालील व्हिडिओवर क्लिक करा.
हिंदी बिग बॉस हा शो बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत आहे. तर, मराठी बिग बॉस हा शो चित्रपट, नाटक दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश वामन मांजरेकर हे होस्ट करत आहेत. सुरुवातीला मराठी बिग बॉस हा हिंदी बिग बॉस कार्यक्रमाची कॉपी असेन असे अनेकांना वाटले. शो होस्ट करतानाही सलमानची छाप असेल असे वाटले. परंतू, मराठी बिग बॉस या शोत्या पहिल्या पर्वात प्रेक्षक आणि समिक्षकांच्या मनात असलेली ही शंका सुरुवातीच्या काही दिवसांतच दूर झाली.
केवळ संकल्पना हा एक घटक वगळता मराठी बिग बॉस सीझन 1 हा पूर्णपणे आपला वेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी झाला. महेश मांजेकर हे हा शो होस्टींग अनेक प्रेक्षकांना आवडले नाही. त्यांच्यावर टीकाही झाली. परंतू ती टीकाही पूर्णपणे स्वतंत्र होती. त्याची हिंदी बिग बॉस किंवा सलमान खान याच्याशी तुलना झाली नाही. मराठी बिग बॉस आणि मांजरेकर यांच्यासह या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक कलाकारांना प्रेक्षकांनी वाद विवाद, टीका-टीपण्णी आणि आपापली स्वतंत्र मते यांसह स्वीकारले. (हेही वाचा, बिग बॉसकडून मेघा धाडेला मिळालेल्या घराचे खास फोटो !)
कलर्स मराठी अधिकृत ट्विट
दरम्यान, मराठी बिग बॉस सीझन टू योतो आहे. त्याचा टीझरही लॉन्च करण्यात आला. मात्र, हा शो नेमका कधी येतो आहे याबाबत मात्र कोणत्याही प्रकारचे भष्य टीझरच्या माध्यमातून करण्यात आले नाही. तसेच, या वेळी या शोचा होस्ट कोण असेल. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला येणारे पाहुणे कोण असणार आहेत. सिझन 1 प्रमाणे याही वेळी केवळ मराठी चित्रपट आणि मालिका कलाकारांना घरात प्रवेश मिळणार की, इतर क्षेत्रातीलही विविध कलाकारांना या घरात प्रवेश मिळणार याबाबत उत्सुकता आहे.