Bigg Boss Marathi Season 2:  'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतील कलाकार 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करण्याची शक्यता
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Instagram)

BBM 2 Contestant: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi)  पहिला सीझन टेलिव्हिजनवर सुपरहिट ठरल्यानंतर आता रसिकांना दुसर्‍या सीझनचे वेध लागले आहेत. नुकताच Bigg Boss Marathi 2 चा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या दुसर्‍या पर्वात कोणकोण मराठी कलाकार झळकणार? ही उत्सुकता वाढली आहे. काहि दिवसांपूर्वी रसिका सुनीलचं (Rasika Sunil) नाव चर्चेमध्ये होते. आता कलर्स वाहिनीवरील राधा प्रेम रंगी रंगली (Radha Prem Rangi Rangali)  या मालिकेतील कलाकार झळकण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. Bigg Boss Marathi Season 2: 'बिग बॉस'चं घर आता मुंबईत?

पहिल्या सीझनमध्ये 'सरस्वती' मालिकेतील मुख्य कलाकार आस्ताद काळे बिग बॉसच्या पहिल्या पर्वात दिसला होता. त्यामुळे 'राधा प्रेम रंगी रंगली' ही मालिका संपणार असून त्याच्या जागी ' जीव झाला वेडापीसा' ही मालिका त्याच्या जागी दिसणार  असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.  त्यामुळे राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतील कलाकार दिसण्याची शक्यता वाढली आहे.  Bigg Boss Marathi Season 2: 'शनाया' फेम रसिका सुनील बिग बॉस 2 च्या घरात?

बिग बॉसच्या घरात कोण करू शकतो प्रवेश?

अर्चना निपाणकर

 

View this post on Instagram

 

सारा जग छड़ के बस तेनु ही है चुनेया || 🌸

A post shared by Archana (@archananipankar) on

अर्चना निपाणकर 'राधा रंगी रंगली' या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेमध्ये झळकळी आहे. या मालिकेतून अर्चना घरा घरामध्ये पोहचली आहे.

 

सचित पाटील

 

View this post on Instagram

 

Prem Deshmukh#1st photo shoot for RPRR.P.C. #bharatpawarphotography #colorsmarathi #radhaprem

A post shared by Sachit Patil (@patil_sachit) on

सचित पाटील हा शांत आणि मितभाषी आहे. काही दिवसांपूवी तो वादामध्ये अडकला होता त्यामुळे आता बिग बॉसच्या घरामध्ये दिसण्याची शक्यता आहे.

अक्षया गुरव

 

View this post on Instagram

 

💞💞💞

A post shared by अक्षया गुरव 🔵 (@akshayagurav_lovers) on

अक्षया गुरव देखील या मालिकेतून घराघरात पोहचली आहे. तिचा अवखळ स्वभाव रसिकांना आवडला आहे. आता ती पॉप्युलॅरिटी बिग बॉसच्या घरात एन्कॅश करणार का? हे पाहणं उत्सुकतेचे आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेहून रसिका सुनील भारतात येणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप त्यावर उलघडा झालेला नाही. कलाकारांसोबतच बिग बॉसचा होस्ट कोण असेल याची चर्चा रंगली आहे. पहिला सीझन महेश मांजरेकरांनी होस्ट केला होता.