Bigg Boss Marathi Season 2: 'बिग बॉस'चं घर आता मुंबईत?
Marathi Bigg Boss Season 2 | | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Bigg Boss Marathi Season 2: 'बिग बॉस'चं घर हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय. गेल्या वर्षीपासून मराठीत सुरु झालेल्या या कार्यक्रमातही ही उत्सुकता कायम राहिली. गेल्या वर्षी 'मराठी बिग बॉस सिझन 1' (Bigg Boss Marathi Season 1) लोनावळ्यात चित्रत झाला. त्यासाठी लोनावळा (Lonavla) येथे 'बिग बॉस घर' आणि भव्य सेट उभारण्यात आला होता. आता लवकरच 'मराठी बिग बॉस सिझन 2' येऊ घातला आहे. 'मराठी बिग बॉस सिझन 2' चे घर हे मुंबई (Mumbai) शहर किंवा शहरालगत असणार आहे. अल्पावधीतच कार्यक्रमाचे चित्रिकरण सुरु होऊन प्रक्षेपनही केले जाईल.

अर्थात 'बिग बॉस'च्या सर्वच गोष्टी कशा गुप्त असतात. हवी ती माहिती हव्या त्या वेळी न देता उगीच ताणून धरायचे आणि उत्सुकता वाढवायची हे त्याचे सूत्र. त्यामुळे 'मराठी बिग बॉस सीझन 2' चा सेट, घर हे खरोखरच मुंबईत असणार का? याबबत कोणतीही माहिती बिग बॉसने दिली नाही. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताच्या आधारे बोलायचे तर, बिग बॉसचे घर मुंबईत असणार आहे. खरे खोटे लवकरच करणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचा उलघडा होईपर्यंत सध्यातरी उत्सुकतेने वाट पाहणे इतकेच चाहत्यांच्या हातात आहे. (हेही वाचा, Bigg Boss Marathi Season 2: 'शनाया' फेम रसिका सुनील बिग बॉस 2 च्या घरात?)

कलर्स मराठी ट्विट

शोची गरज लक्षात घेता बिग बॉसचे चित्रिकरण मुंबईत होणे फायद्याचे आहे. यापूर्वी मल्याळम 'बिग बॉस'चे चित्रिकरण मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटीत झाले होते. त्या वेळचा अनुभव पाहता मराठी 'बिग बॉस'चे चित्रिकरणही मुंबईत होऊ शकते, अशी चर्चा आहे.