Bigg Boss Marathi 2 Second Promo: बिग बॉस मराठी सीझन 2 च्या घरात आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार यंदा सर्वांची झोप उडवणार? (Watch Video)
Bigg Boss Marathi Season 2 Promo (Photo Credits-Twitter)

BBM 2 Second Promo: बिग बॉस मराठी 2 सीझनचा दुसरा प्रोमो आज (28 एप्रिल) प्रदर्शित करण्यात आला आहे. तर आजच्या प्रोमोमध्ये तमाशाचा फड दिसून येत असून नृत्य करणारी कलाकार कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा दुसऱ्या प्रोमेमधील लूक एका मराठमोठ्या अंदाजात दिसून येत आहे.

तर बिग बॉस मराठी 2 सीझनची घोषणा करण्यात आल्यापासून प्रेक्षकांना याची उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच कोणकोणते स्पर्धक यामध्ये सहभागी होणार याबद्दल ही चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसऱ्या प्रोमो मधील आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार यंदा सर्वांची झोप उडवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.(Bigg Boss Marathi 2 First Promo: यंदा बिग बॉस मराठी 2 च्या घरात राजकारणी घेणार स्पर्धक म्हणून एन्ट्री? (Watch Video)

पहिल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर हे एका राजकरणातील व्यक्तीच्या रुपात झळकले होते. मात्र आजच्या प्रोमोमध्ये त्यांनी तमाशाच्या फडात उपस्थिती लावली असल्याचे दिसून आले आहे. तर तमाशाच्या फडात बघ्यांची सुद्धा उपस्थिती भरपूर दिसून आली असून तमाशाचा आनंद घेताना दिसून येत आहेत.