Bigg Boss Marathi Season 2: 'बिग बॉस'च्या यंदाच्या पर्वात स्पर्धकांना शहरी- ग्रामीण विभागाच्या जीवनाचा आनंद घेता घेणार?
Bigg Boss Marathi Season 2 (Photo Credits-Twitter)

Bigg Boss Marathi Season 2: बिग बॉस मराठी सीझन 2 चा नुकताच प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर यंदाच्या सीझनसाठी थीम काय असणार कोणते स्पर्धक यामध्ये सहभागी होणार याबद्दल चर्चा जोरदार रंगल्या आहेत. मात्र आता बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात दोन विभागात घराची थीम असणार असल्याचे महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे.

यामध्ये स्पर्धकांना शहरी आणि ग्रामीण सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी बिग बॉस मराठी सीझन 1 चे शूटिंग लोणावळ्यात झाले होते. तर यंदाचा सीझनसाठीचा सेट गोरेगाव फिल्म सीटी येथे उभारण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे काही स्पर्धकांना शहरी आणि ग्रामीण जीवनाच्या सुखसोईंचा आनंद घेता येणार आहे.(हेही वाचा-Bigg Boss Marathi Season 2: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मराठी बिग बॉस सिझन 2; पाहा टीझर)

येत्या 12 मे रोजी बिग बॉसचा सीझन 2 सुरु होणार आहे. तर हिंदी बिग बॉस 7 चा सीझन सुद्धा याच थीमवर आधारित होता. त्यामुळे यंदाचा पर्वाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.