'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादा ची होणार एक्झिट? समोर आला नवा प्रोमो
Tujyat jiv Rangla (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वरील सर्वांची आवडती मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tujyat Jiv Rangla) आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पैलवान गडी राणादा या मालिकेतून लवकरच एक्झिट घेणार असे अनेक दिवसांपासून ऐकायला मिळत होते. मात्र त्याबाबत या मालिकेच्या टीमकडून किंवा वाहिनीकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नव्हती. मात्र आता नुकताच झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात प्रोमो खाली 'गुडबाय राणादा' असे म्हटले आहे.

या प्रोमो मध्ये राणाला नंदिता वहिनीचा डाव समजतो. त्यामुळे पुर्णपणे बिथरलेला राणादा घराबाहेर पडतो. घाबरलेली नंदिता परेश पाटील ला राणादा ला मारण्यास सांगते. परेश पाटीलचे लोक राणादा ला खूप मारतात आणि नदीत फेकून देतात. मात्र यात त्याचा मृत्यू होईल की बचावेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

View this post on Instagram

 

गुडबाय राणादा 😔😔 #TujhyatJeevRangala #ZeeMarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, राणादा हा केवळ जखमी होणार असून तो महिन्याभरासाठी या मालिकेतून एक्झिट घेणार आहे.

'तुला पाहते रे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल विक्रांत सरंजामेचा शेवट

महिन्याभरानंतर या मालिकेत राणादाचे नवीन रुप पाहायला मिळू शकते. ज्यात राणादा बारीक झालेला दिसेल. त्याचप्रमाणे मालिकेच्या कथानकात आणि सेटमध्ये बदल करण्यात येतील असे सांगण्यात येतेय.