Sultanpuri Horror Case: दिल्लीतील (Delhi) सुलतानपुरी हॉरर केसमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री अंजली सिंहचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर एफएसएल अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अंजलीला चिरडणाऱ्या कारच्या अहवालात अंजली कारच्या डाव्या बाजूला पुढील चाकात अडकल्याचे समोर आले आहे. कारच्या डाव्या बाजूला पुढच्या आणि मागच्या चाकाखाली बहुतेक रक्ताचे डाग आढळले. रिपोर्टनुसार, अंजली कारमध्ये उपस्थित असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
शरीरावर 40 हून अधिक जखमांच्या खुणा -
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये 40 जखमींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी बहुतेक जखमा आणि ओरखडे आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अंजलीचा ब्रेन मैटर गायब असल्याचे आणि दोन्ही फुफ्फुसे स्पष्टपणे दिसत असल्याचे समोर आले. एवढेच नाही तर डोक्याला, मणक्याला, डाव्या मांडीचे हाड आणि दोन्ही फुफ्फुसांना गंभीर दुखापत झाल्याने मृतदेहाची अतिशय वाईट अवस्था झाली. जास्त रक्तस्त्राव झाल्याने अंजली सिंह यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा-Delhi Shocker: मतभेदातून मैत्रिणीवर धारदार वस्तूने 3-4 वार केल्याप्रकरणी 22 वर्षीय तरूणाला अटक; सीसीटीव्हीत घटना कैद (Watch Video))
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी नाही -
अंजलीच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टवर जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे या प्रकरणात बलात्काराला दुजोरा मिळालेला नाही. पोस्टमॉर्टममध्ये पीडितेच्या डोक्यापासून मणक्यापर्यंतची हाडं तुटलेली आढळून आली.
अंजलीचा मृत्यू कसा झाला?
अंजलीच्या मृत्यूचे कारण शरीरावर अनेक गंभीर जखमा असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. अंजलीच्या डोक्यापासून, मणक्यापासून पायापर्यंतची हाडे मोडली होती. मात्र, रासायनिक विश्लेषण आणि जैविक नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. अंजलीचा मृतदेह सापडला तेव्हा तिचे कपडे फाटलेले होते आणि तिच्या पाठीला खूप जखम झाली होती.