Shahrukh Khan च्या ऑन-स्क्रीन मुलीचा झाला साखरपुडा; प्रियकराने केलं खास अंदाजात प्रपोज, युजर म्हणाले, अंजलीला तिचा राहुल भेटला

वडील शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच राहुल खन्ना यांचा दुसरा विवाह करण्याच्या मिशनवर निघालेल्या अंजलीने सर्वांची मनं जिंकली. पण आता ती मोठी झाली आहे. आता ती स्वतः च्या लग्नासाठी तयार झाली आहे. होय, अंजली म्हणजेच सना सईद (Sana Saeed) ने एंगेजमेंट केली आहे.

Shahrukh Khan च्या ऑन-स्क्रीन मुलीचा झाला साखरपुडा; प्रियकराने केलं खास अंदाजात प्रपोज, युजर म्हणाले, अंजलीला तिचा राहुल भेटला
Sana Saeed Engagement (PC - Instagram)

Sana Saeed Engagement: तुम्हाला लहान अंजली आठवत असेल. जिने आपल्या क्यूटनेसने सर्वांची मनं जिंकली होती. वडील शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच राहुल खन्ना यांचा दुसरा विवाह करण्याच्या मिशनवर निघालेल्या अंजलीने सर्वांची मनं जिंकली. पण आता ती मोठी झाली आहे. आता ती स्वतः च्या लग्नासाठी तयार झाली आहे. होय, अंजली म्हणजेच सना सईद (Sana Saeed) ने एंगेजमेंट केली आहे.

करण जोहरचा चित्रपट कुछ कुछ होता है फेम सना सईदने एंगेजमेंट केली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने सनाला तिच्या प्रियकराने प्रपोज केले आणि अंगठी घालून तिला कायमचे आपले बनवले. सनाने एक व्हिडिओ पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. सनाने कॅप्शनमध्ये विशेष काही लिहिले नसले तरी हृदय, अंगठी आणि लव्ह फेस इमोटिकॉन्सने तिचा आनंद व्यक्त केला. (हेही वाचा - Anilmal First Look Poster: नववर्षाच्या मध्यरात्री प्रदर्शित झाले 'अॅनिमल'चे फर्स्ट लूक पोस्टर; रणबीर कपूरचा खूंखार अंदाज पाहून तुम्हीही व्हाल अवाक!)

व्हिडिओमध्ये सनाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. काळ्या रंगाचा गाऊन आणि थाई हाय शूजमध्ये सना खूपच सुंदर दिसत आहे. त्याच वेळी तिचा मंगेतर सबा वॉर्नर देखील तिच्यासोबत काळ्या सुटमध्ये दिसत आहे. सबाने तिला गुढग्यांवर बसवून प्रपोज केलं आहे. हे दृश्य पाहून अभिनेत्री आनंदाने नाचताना दिसली. या व्हिडिओमध्ये सना तिची सुंदर डायमंड रिंग फ्लॉंट करताना दिसली होती. तिने आपल्या मंगेतरसोबत अनेक पोज दिल्या.

दरम्यान, सना बऱ्याच दिवसांपासून सबा वॅगनरला डेट करत होती. सबा एक हॉलिवूड साउंड डिझायनर आहे. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. सबा अनेकदा अभिनेत्रीसोबतचे फोटो पोस्ट करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

सनाच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केले. सनाचे बालपणीचा सहकलाकार परजान दस्तूरने तिचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर तनुज विरवानी, रिझवानसह अनेक सेलिब्रिटींनीही अभिनंदन केले आहे. कमेंट करताना लोक म्हणत आहेत की, अखेर अंजलीला तिचा खरा राहुल सापडला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2023 03:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).