Anilmal First Look Poster: नववर्षाच्या मध्यरात्री प्रदर्शित झाले 'अॅनिमल'चे फर्स्ट लूक पोस्टर; रणबीर कपूरचा खूंखार अंदाज पाहून तुम्हीही व्हाल अवाक!
'अॅनिमल'चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहते या चित्रपटाच्या रिलीजसाठी आतुर दिसत आहेत. 11 ऑगस्ट 2023 रोजी रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
Anilmal First Look Poster: हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चा प्रसिद्ध चित्रपट 'अॅनिमल'चा (Anilmal) फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला आहे. 'अॅनिमल' च्या या फर्स्ट लूक पोस्टरची रिलीज डेट 30 डिसेंबरलाच जाहीर करण्यात आली होती. अशा स्थितीत नववर्षाच्या मध्यरात्री 'अॅनिमल'चे दमदार फर्स्ट लूक पोस्टर चाहत्यांची उत्कंठा वाढवणारे आहे. 'अॅनिमल'च्या या पोस्टरमध्ये रणबीर कपूर अतिशय उग्र स्टाईलमध्ये दिसत आहे.
नवीन वर्षाच्या मध्यरात्री 12 वाजता चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'अॅनिमल'चे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुपरस्टार एका नव्या अंदाजात पाहायला मिळत आहे. हातात कुऱ्हाड, तोंडात सिगारेट आणि रक्ताने माखलेला रणबीर कपूर खूपच धोकादायक दिसत आहे. (हेही वाचा - Siddharth Malhotra & Kiara Advani Wedding: अखेर मुहूर्त ठरला! बॉलिवुडचं क्युट कपल सिध्दार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नवीन वर्षात विवाह बंधनात अडकणार)
'अॅनिमल'च्या या फर्स्ट लूक पोस्टरवरून याचा अंदाज बांधता येतो की, शमशेरा चित्रपटाप्रमाणेच यावेळीही प्रेक्षकांना रणबीरचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. 'अॅनिमल'च्या या पोस्टरने चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित केली आहे. 'अॅनिमल'चे हे लेटेस्ट पोस्टर सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे.
View this post on Instagram
'अॅनिमल'चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहते या चित्रपटाच्या रिलीजसाठी आतुर दिसत आहेत. 11 ऑगस्ट 2023 रोजी रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार रणबीर कपूरशिवाय साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत आहे. एवढेच नाही तर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर आणि बॉबी देओल रणबीरसोबत अॅनिमलमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. संदीप रेड्डी वंगा यांनी 'अॅनिमल' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2023 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

