२०२२ या वर्षात रणबीर-आलिया, रिचा चढ्ढा- अली फैजल, मौनी रॉय-सुरज नामिबियार अशा विविध जोड्या विवाह बंधनात अडकल्या. पण या जोड्या बरोबरचं बॉलिवुड मधील क्युट कपल सिध्दार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लवकरचं विवाह बंधनात अडकणार असल्याच्या खुप चर्चा झाल्या. पण आता या सगळ्या अफवा किंवा चर्चांवर शिक्का मोर्तब झाला असुन अखेर सिध्दार्थ आणि कियाराच्या लग्नाचा मुहूर्त आखेर ठरला आहे. येत्या वर्षात २०२३ मध्ये व्हेलंटाईन्सच्या महिन्यात म्हणजेचं ६ फेब्रुवारीला अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लग्नाबंधानात अडकणार असल्याची माहिती ईटी टाईम्सकडून प्रदर्शित करण्यात आली आहे. तर हा शाही विवाह सोहळा राजस्थानच्या जेसलमेर येथे पार पडणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

 

तरी यापूर्वी अनेक रिअलिटी शो, मुलाखती दरम्यान दोघही एकमेकांचे चांगले मित्र असल्याची कबुली दिली आहे. पण रिलेशनशीप बद्दल मात्र दोघांनीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तरी यापूर्वी करण जोहर निर्मित शेअरशाह या भारतीय सैनिक विक्रम बत्रा यांच्या बायोपिकमध्ये कियारा आणि सिध्दार्थने स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतरचं या दोघांच्या नात्याबाबत बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं होत. तरी आता या चर्चांना पुर्णविराम लागला असुन हे दोघही लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहे. (हे ही वाचा:- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम मिस्टर अय्यर Tanuj Mahashabde वयाच्या 42व्या वर्षी चढणार बोहल्यावर? पहा समोर आलेलं सत्य)

 

"सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह मुहूर्त 6 फेब्रुवारी ठरला असुन त्यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहेत. सिध्दार्थ-कियाराचं मेहंदी, हळदी आणि संगीत हे समारंभ अगदी धुमधडाक्यात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. तर कियारा-सिध्दार्थचा शाही विवाह सोहळा शाही हॉटेल येथे ६ फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. बॉलिबुडमधील अनेक सितारे या शाही विवाह सोहळ्यास हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.