Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम मिस्टर अय्यर Tanuj Mahashabde वयाच्या 42व्या वर्षी चढणार बोहल्यावर? पहा समोर आलेलं सत्य!
तनुज महाशब्दे । PC: Instagram

टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत मिस्टर अय्यर (Krishnan Iyer) ही भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्दे (Tanuj Mahashabde) वयाच्या 42 व्या वर्षी बोहल्यावर चढणार असल्याच्या बातम्या रंगत आहेत. त्यासोबतच अजून एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे त्यांची रिअल लाईफ पत्नी रील लाईफ पत्नी 'बबिता' पेक्षा सुंदर आहे. दरम्यान तनुज महाशब्दे यांच्या पत्नीचं नाव आणि झलक अद्याप समोर आलेली नाही.

खरंच तनुज महाशब्दे होणार विवाहबद्ध?

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, तनुज महाशब्दे हे 2023 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या पत्नी बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फोटोदेखील समोर आला नाही. पण रंगलेल्या चर्चेमध्ये तनुज यांची ऑनस्क्रिन पत्नी बबिता अर्थात मुनमुन दत्ता यांच्यापेक्षाही त्यांची रिअल लाईफ पत्नी सुंदर आहे. लुक्स आणि हॉटनेसमध्ये ती मुनमुन यांच्यापेक्षा सरस आहे. पण 'आज तक डॉट इन' सोबत बोलताना अभिनेता तनुज महाशब्दे यांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांच्या लग्नाच्या या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Munmun Dutta Accident: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्री बबिता जी चा जर्मनीत अपघात, फोटो पाहून चाहते अस्वस्थ .

अनेकदा मुनमुन दत्ता आणि तनुज महाशब्दे एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा होत्या. पण दोन्ही कलाकारांनी त्या फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान आपण सेटवर चांगले मित्र म्हणून बराच वेळ चांगला घालवत असल्याचं दोघांनीही कबुल केले आहे.

मालिकेत दक्षिण भारतीय मिस्टर अय्यर एक वैज्ञानिक असल्याचं दाखवलं आहे. त्याची पत्नी बबिता ही अत्यंत रूपवान आहे. त्यामुळे ही जोडी ऑनस्क्रिन इतर पात्रांकडून अनेकदा ट्रोल होताना दाखवली आहे. त्यामुळे आता खर्‍या आयुष्यात तनुज महाशब्दे याच्या आयुष्यात येणारी पार्टनर कशी असेल याची चर्चा रंगली आहे. तिची तुलना अनेकदा मुनमुन सोबत होते.