PPF Rules: तुमची PPF अकाऊंट्स किती आहेत ? सावधान! अडचणीत येण्यापर्वीच वापरा हे पर्याय
Public Provident Fund Rules | (Photo courtesy: archived, edited images)

Public Provident Fund Rules: पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) पैसे बचतीचा एक चांगला मार्ग आहे. PPF मध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या गाठीला गलेलठ्ठ रक्कमही जमा होते आणि भराव्या लागणाऱ्या विविध करांपासूनही सवलत (Tax Rebate) मिळते. शिवाय PPF मध्ये साठलेली ही रक्कमही करमुक्त (Tax Free) असते. सद्यास्थितीत PPF वर वर्षाकाठी 8 टक्के इतके व्याज मिळते. त्यामुळे देशातील बहुतांश नागरीक PPF मध्ये रक्कम गुंतवण्यास नेहमीच प्राधान्य देतात. पण, असे असले तरी काही मंडळी अधिक हव्यासापोठी PPF ची एकापेक्षा अधिक खाती काढतात. तुम्हीही PPF ची एकापेक्षा अधिक खाती काढली असतील तर, वेळीच सावधान! PPF चे नियम अगदी कडक आहेत. तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर तुम्ही एकापेक्षा अधिक खाती काढल्याने अडचणीत येणे टाळू इच्छिता. तर, तुमच्यासाठी आम्ही काही उपाय येथे सांगत आहोत.

एकच PPF खाते उघडण्याचा नियम

मॅच्युरीटी पीरियड (Maturity Amounts) 15 वर्षांचा असलेलेल हे खाते तुम्ही कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. परंतु, कोणताही व्यक्ती आपल्या नावावर केवळ एकच PPF अकाऊंट उघडू शकतो. मग ते बँकेतील असो किंवा पोस्टातील.

एकापेक्षा अधिक PPF खाती

PPF कायदे आणि नियमांनुसार कोणत्याही व्यक्तिचे PPF चे एकच खाते असणे बंधनकारक आहे. अगर नजरचुकीने किंवा काही कारणांनी ही खाती दोन किंवा त्याहून अधिक झाली तर, दुसरे खाते हे कायदेशिररित्या अधिकृत किंवा वैध मानले जात नाही. त्यामुळे त्या खात्यावर रक्कम भरली तर, व्याजही मिळणार नाही. अल्पवयीन व्यक्तिच्या नावेही त्याचे आई, वडील PPF अकाऊंट काढू शकतात. परंतु, आई-वडील एकाच मुलाच्या नावे वेगवेगळी खाती काढू शकत नाहीत. (हेही वाचा, कर्जबुडव्यांना लगाम, एकाच क्लिकवर कर्जदाराची कुंडली; 'आरबीआय'चे डिजिटल पाऊल)

PPF ची दोन खाती तयार झाली असल्यास?

जर PPF दोन खाती तयार झाली असल्यास अर्थमंत्रालयाकडे अर्ज करावा लागेल. या अर्जात दोन्ही PPF खात्यांचा सर्व तपशील द्यावा लागेल. तसेच, हा अर्ज पोस्टाने पाठवावा लागेल. हा अर्ज खात्याला प्राप्त झालन्यानंतर तुमच्या खात्यावर त्या वर्षभरात जमा झालेली एकूण रक्कम तपासली जाईल. ही रक्कम जर 1.5 लाख रुपयांची मर्यादा ओलांडत असेल तर, 1.5 लाख रुपयांवरची जितकीही रक्कम असेल ती रक्कम कोणत्याही व्याजाशिवाय खातेधारकाच्या (अर्जदार) खात्यावर वर्ग करण्यात येईल. एकापेक्षा अधिक PPF खाती असल्यास तुमची रक्कम सुरक्षित राहिल मात्र त्याव मिळणारा व्याज त्याचा परतावा न मिळता केवळ मूळ रक्कमच मिळेल. त्यामुळे तुमचीही PPFची दोन खाती असल्यास सावधान. वेळीच योग्य पर्याय निवडा.