PF Benefits: नोकरी सोडल्यावर किंवा बदली केल्यावर लगेच पीएफ मधील पैसे का काढू नये?
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

PF Benefits: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला एक निश्चित रक्कम पीएफ फंडाच्या रुपात मिळते. ही रक्कम EPFO यांच्याकडून सांभाळली जाते. टॅक्स आणि गुंतवणूक करणाऱ्या जाणकरांच्या मते पीएफ मध्ये जमा झालेले पैसे जर खरंच गरज असल्यास काढावे. त्याचसोबत पीएफ मधील जमा झालेल्या रक्कमेमुळे विविध प्रकारचे लाभ सुद्धा नागरिकांना मिळतात.(रेल्वे कर्मचाऱ्यांना PF Advance आणि Balance Check करण्यासाठी नवी ऑनलाईन सेवा लॉन्च, जाणून घ्या अधिक)

कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निठी संगठनेत अन्य योजनेच्या तुलनेत अधिक व्याज दिले जाते. सध्याच्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना 8.5 टक्क्यांनी व्याज दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना आयकर कायद्याअंतर्गत कलम 80(C) नुसार टॅक्समध्ये सूट दिली जाते.(How To Check LIC Policy Status Online: एलआयसी पॉलिसी चे स्टेटस ऑनलाईन कसे चेक कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

पीएफमध्ये जमा झालेली रक्कम आपल्या अत्यावश्यक असल्याच काढावी. नुकत्याच सरकारकडून कोरोना व्हायरसच्या काळात अंक्षत: रुपात पीएफ काढण्याची परवानगी दिली गेली होती. कर्मचारी भविष्य निधी संगठनचे कर्मचारी जर नोकरीच्या वेळी सतत योगदान देत असल्यास आणि याच वेळी एखाद्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला इंश्युरन्स स्किम, 1976 चा लाभ घेता येतो. दरम्यान, कर्मचारी भविष्य निधी संगठन नियमानुसार नोंदणीकृत कंपनीचे कर्मचारी पीएफ फंडात आपल्याकडून गुंतवणूक करु शकतात. पीएफ फंडात कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनासह महागाई भत्ता 12 टक्क्यांसमान रक्कम जमा करावी लागते.