रेल्वे कर्मचाऱ्यांना PF Advance आणि Balance Check करण्यासाठी नवी ऑनलाईन सेवा लॉन्च, जाणून घ्या अधिक
Indian Railway (Photo Credits: File Photo)

भारतीय रेल्वेने गुरुवारी HRMS च्या अंतर्गत तीन नवे मॉड्युल्स लॉन्च केले आहेत. यामध्ये कर्मचारी स्वयं सेवा (ESS), प्रोविडेंट फंड अॅडवान्स आणि सेटलमेंट मॉड्युल यांचा समावेश आहे. यामुळे आता रेल्वे कर्मचाऱ्यांना सहजपणे आपला पीएफ बॅलेन्स तपासून पाहता येणार आहे. त्याचसोबत पीएफ अॅडवान्ससाठी सुद्धा अर्ज करु शकणार आहेत. रेल्वेच्या सिस्टिमची दक्षता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. भारताला डिजिटल रुपात सशक्त समाज बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन साकार करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलले आहे.(येत्या 1 डिसेंबरपासून आर्थिक व्यवहारांशी संबंधित होणार 'हे' महत्त्वाचे बदल, रेल्वेतही होणार मोठा बदल)

एचआरएमएस कडून अशी अपेक्षा केली जात आहे की, सर्व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर मोठा प्रभाव पडणार आहे.रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वीके यादव यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी रेल्वे कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी उपयोगी HRMS आणि युजर फ्रेंडली सुविधा लॉन्च केल्या आहेत.(How To Check LIC Policy Status Online: एलआयसी पॉलिसी चे स्टेटस ऑनलाईन कसे चेक कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

प्रोविडेंट फंड अॅडवान्स मॉड्युलच्या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांना आपला पीएफ बँलेन्स पाहू शकणार आहेत.तसेच पीएफ अॅडवान्ससाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येणार आहे. सेटलमेंट मॉड्युलच्या माध्यमातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा डिजिटल पद्धतीने त्यांचे कामकाज करता येणार आहे. कर्मचाऱ्यांना ऑनलाईन रुपात आपले सेटलमेंट/ पेन्शन बुकलेट सुद्धा भरु शकणार आहेत. सर्विस आणि तपशील ऑनलाईन ही मिळवता येणार आहे. पेन्शनचे संपूर्ण काम ही ऑनलाईन होणार आहे.