आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आर्थिक सुरक्षेसाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. यात म्युच्यूअल फंड पासून वीमा पॉलिसीचा समावेश आहे. एलआयसी पॉलिसी साधारणपणे आपल्या मुलांच्या नावावर सुरु केली जाते. यामुळे मुलांचे भविष्य सुरक्षित राहील, अशी आशा असते. मात्र पॉलिसीसंबंधित अनेक गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते. उदा. पॉलिसी स्टेटस, पैसे जमा करण्याची तारीख आणि अवधी इत्यादी. अशावेळी ऑनलाईन माध्यम तुमच्या मदतीला धावून येईल. एलआयसी पॉलिसीचे स्टेटस (LIC Policy Status) तुम्ही वेळोवेळी ऑनलाईन चेक करु शकता. डिजिटल सेवेचा वापर करुन तुम्ही ऑनलाईन किंवा मोबाईलद्वारे आपल्या एलआयसी पॉलिसी विषयी सर्व माहिती जाणून घेऊ शकता. ही प्रक्रीया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला केवळ काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
एलआयसी पॉलिसीचे स्टेटस ऑनलाईन पहिल्यांदाच चेक करत असाल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यांनतर तुम्हाला नोंदणीचा ईमेल येईल. सर्वप्रथम एलआयसीच्या वेबसाईटवर नोंदणी कशी करावी, हे जाणून घेऊया..
# यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळ licindia.in वर जावे लागेल.
# त्यानंतर 'न्यू युजर' या पर्यायावर क्लिक करा.
# तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड सिलेक्ट करावे लागेल आणि त्यात माहिती भरावी लागेल.
# त्यानंतर तुम्हाला 'e-services' चा पर्याय निवडावा लागेल.
# बनवलेल्या लॉग-इन आयडीने लॉग-इन करणे गरजेचे आहे.
# पॉलिसी ई-सेवेसाठी दिलेला फॉर्म योग्य प्रकारे पूर्ण करुन ई-सर्व्हिस वर रजिस्ट्रर करावे लागेल.
# या प्रक्रियेनंतर आपल्या फॉर्मची प्रिंट घेऊन त्यावर सही करुन फॉर्मचा फोटो काढून तो अपलोड करावा लागेल.
# एलआयसीच्या व्हेरिफिकेशननंतर ग्राहकास रजिस्ट्रेशनचा ईमेल किंवा एसएमएस येईल.
एलआयसी पॉलिसीचे ऑनलाईन स्टेटस असे चेक करा:
# सर्वप्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये कस्टमर पोर्टलचा पर्याय निवडा.
# त्यानंतर रजिस्टर्ड यूजर पर्यायाची निवड करा.
# Username, Birthday Date, Password भरुन 'Go' पर्याय निवडा.
# हे केल्यानंतर एक पेज ओपन होईल. यात तुम्ही 'View Enrolled Policies' या पर्यायाची निवड करा.
# येथे तुमच्या पॉलिसी संबंधित एक नवे पेज खुले होईल. त्यात तुम्हाला तारीख, प्रीमियम रक्कम आणि संपूर्ण बोनसची माहिती दिली जाईल.
# यात एलआयसी पॉलिसी नंबर टाकून क्लिक करा आणि स्टेटस जाणून घ्या.
अशाप्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने एलआयसी पॉलिसी स्टेटस ऑनलाईन चेक करु शकता. त्यामुळे तुमचा गोंधळ उडणार नाही आणि वेळही वाचेल.