Representational Image | Indian Railways (Photo Credits: PTI)

लांबच्या प्रवासामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध सोबत असतील तर त्यांना ट्रेन मध्ये अप्पर बर्थ वरून प्रवास करणं कठीण असतं. अशावेळी वयोवृद्धांना लोअर बर्थ मिळेल यासाठी नेमकं तिकीट बुकिंग कसं करायचं? याचा खुलासा आता थेट आयआरसीटीसी कडूनच करण्यात आला आहे. अनेकांची ही तक्रार आहे की सिनियर सिटीझन असून देखील अनेकदा त्यांना लोअर बर्थ मिळत नाही. ट्वीटर वर एका प्रवाशाने केलेल्या याच तक्रारीवर उत्तर देताना आयआरसीटीसी ने याबाबतचा खुलासा केला आहे.

आयआरसीटीसी ने दिलेल्या माहितीनुसार, जर जनरल कोटा मधून तिकीट काढलं असेल तर तुम्ही लोअर बर्थ साठी प्राधान्य विचारू शकता पण तिकीट मात्र उपलब्धतेवरूनच दिलं जातं. मात्र यानंतर तुम्हांला रिझर्व्हेशन चॉईस मध्ये "Book only if the lower berth is allotted" हा पर्याय देखील असतो. तो निवडल्यास तुमचं तिकीट लोअर बर्थ असेल तरच बूक करण्याचा पर्याय असतो.

जनरल कोटा मध्ये प्रवाशांचं तिकीट बुकिंग हे मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकाच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे अशावेळी तुम्ही ट्रेन मध्ये टीसी सोबत बोलून लोअर बर्थची जागा पाहू शकता.

नियमांनुसार, झोपण्याची जागा राखून ठेवलेल्या सर्व गाड्यांमध्ये, स्लीपर क्लासमध्ये प्रत्येक डब्यात सहा लोअर बर्थ आणि एसी 3 टायर आणि एसी-2 टायर क्लासमध्ये प्रत्येक कोचमध्ये प्रत्येकी 3 लोअर बर्थचा एकत्रित कोटा ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चित करण्यात आला आहे.

45 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला प्रवासी आणि गर्भवती महिला जर राजधानी, दुरांतो आणि पूर्णपणे वातानुकूलित/एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करत असतील तर तेथे 3AC मधील या कोट्याअंतर्गत राखून ठेवल्या जाणार्‍या बर्थची संख्या सामान्य मेल/एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रति डब्यात 3 लोअर बर्थच्या तुलनेत प्रति डबा 4 लोअर बर्थ आहे.