PAN Card Reprint Online Application: पॅन कार्ड हरवल्यास, खराब झाल्यास नवं कसं मिळवाल?
PAN Card Update | (Photo Credit- File Photo)

आर्थिक व्यवहारांमध्ये तसेच KYC मध्ये पॅन कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र मागितलं जातं. नवं बॅंक खातं उघडण्यापासून ते अगदी म्युचल फंड, डिमॅट अकाऊंट उघडण्यापर्यंत पॅन क्रमांकाचा पुरावा मागितला जातो. आजकाल आधार कार्ड सोबत पॅनकार्ड लिंक केलेले असते. बॅंकांमध्ये, मोबाईल क्रमांकामध्ये त्याचं लिकींग केलं जातं. पण चुकून तुमचं पॅनकार्ड गहाळ झालं असेल, हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर टेंशन नको. आता घरबसल्या, ऑनलाईन नवं पॅनकार्ड (PAN Card)  मिळू शकतं. मग तुम्हांला देखील नवं पॅनकार्ड हवं असेल तर जाणून घ्या ऑनलाईन ते मिळवण्याची नेमकी प्रक्रिया कशी असते?

अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये पॅनकार्ड हा पुरावा म्हणून मागितलं जातं. त्यामुळे ते तुमच्याजवळ असणं अत्यावश्यक आहे. पण कधी ते तुटलं, हरवलं तर नवीन मिळेपर्यंत मोठी पंचायत होते. पण आता ते पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया सुकर केलेली आहे. जर तुमच्या जुन्या कार्डमध्ये काही बदल नसतील तर जुनंच रिप्रिंट करण्याची देखील सोय आहे. Aadhar Card: Phone Number शी लिंक नसलेलं आधार कार्ड हरवलं तरी काळजी नको, 'या' स्टेप्स वापरुन पुन्हा मिळवा तुमचा आधार.

पॅनकार्ड गहाळ झाल्यानंतर नवं कसं मिळवाल?

  • www.onlineservices.nsdl. com/paam/ReprintEPan.html या लिंकवर तुम्हांला ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन करता येऊ शकते.
  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक रिक्वेस्ट फॉर्म उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हांला पॅन नंबर, आधार नंबर, जन्म तारीख असे अपडेट भरायचे असतात.
  • यावेळी आधार कार्डचे डिटेल्स वापरत तुम्हांला नवं कार्ड रिप्रिंट करण्यासाठी अनुमती द्यावी लगते.
  • त्यानंतर कॅप्चा एंटर करा.
  • त्यानंतर तुमची ऑनलाईन रिक्वेस्ट सबमीट केली जाते.

दरम्यान ऑनलाईन रिप्रिंट अ‍ॅप्लिकेशन करताना ते NSDL e-Gov किंवा Instant e-PAN’ facility द्वारा पॅनकार्ड साठी अर्ज केला जाऊ शकतो. आधार कार्ड आणि पॅनकार्ड वर सारखाच मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे. तसं नसल्यास त्यासाठी वेगळी रिक्वेस्ट करावी लागते.बदल करण्यासाठी मोबाईल क्रमांक रजिस्टर असणं आवश्यक आहे.

भारतामध्ये पॅन कार्ड घरपोच मिळावे यासाठी 50 रूपये तर भारताबाहेर 959 रूपये आणि टॅक्स अशी किंमत आकारली जाते.