How To Find Lossed Aadhar Card: आजच्या घडीला आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे ओळखपत्र आहे. सरकारी व खाजगी अशा अर्ध्याहुन अधिक कामात आधार कार्डाची गरज लागतेच त्यामुळे जर का तुमचे आधार कार्ड हरवले तर डोक्याला नसता ताप होऊ शकतो, यात सुविधा म्हणुन आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांंक लिंंक करण्यास सांंगितले जाते, जेणेकरुन कार्ड हरवल्यास ते फोननंंबर च्या नुसार पुन्हा मिळवता येईल मात्र या ना त्या कारणाने अजुनही तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंंबर लिंंक नसेल आणि तुमचे आधार कार्ड हरवले तर काय करायचं. अशा परिस्थितीत आधी तर कोणीही गोंंधळुन,घाबरुनच जाईल पण आता तुम्हाला काळजीचे कारण नाही. आज आपण काही अशा सोप्प्या स्टेप्स पाहणार आहोत ज्यानुसार आपण मोबाईलशी लिंंक नसलेले हरवलेले आधार कार्ड पुन्हा नवीन म्हणुन पटकन मिळवु शकाल. PAN Card संदर्भातील 'ही' चूक पडू शकते महागात; भरावा लागेल 10,000 दंड, जाणून घ्या सविस्तर
मोबाईल नंबर लिंंक नसलेले हरवलेले आधार कार्ड पुन्हा कसे मिळवाल?
-सर्वात आधी www.uidai.gov.in वेबसाइट सुरु करुन आधार सेवा टॅब मध्ये Order Aadhaar Reprint पर्याय निवडा.
-यानंंतर पुढील पेज उघडेल ज्यात 12 अंकांंचा आधार नंंबर किंवा 16 अंंकांचा व्हर्च्युल आयडी क्रमांंक टाका.
- खाली तुम्हाला कॅप्चा कोड भरण्यास सांंगितला जाईल.
- यानंंतर Mobile number is not Registered वर टिक करा,
-तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर करण्याचा पर्याय मिळेल त्यानुसार नंंबरवर आलेला OTP वापरुन रजिस्ट्रेशन करा
-पुढच्या पेज वर तुम्हाला 50 रुपयांंचे पेमेंट करायचे आहे. पेमेंट नंंतर तुम्हाला रिसिप्ट मिळेलजी डाउनलोड करुन ठेवा.
-ही प्रक्रिया पुर्ण होताच तुम्हाला UIDAI द्वारे आधार कार्ड प्रिंट करुन पाठवले जाईल आपके दिए गए पते पर भेज दिया जाएगा.
-लक्षात ठेवा या मध्ये तुम्ही रजिस्टर केलेला मोबाईल नंंबर हा थेट आधारकार्ड ला लिंंक होत नाही त्यासाठी वेगळ्या प्रक्रिया आहेत.
आधार कार्ड ची सुविधा सुरु झाल्यापासुन आजवर इतकी वर्ष सरकारी यंंत्रणांंकडुन वारंवार आपले आधार कार्ड आणि फोन नंंबर लिंंक करुन घ्यायला सांंगितले गेलेय, मात्र तरीही तुम्ही अजुन हे काम पुर्ण केले नसेल तर थोडा वेळ काढुन हे काम लवकरच पुर्ण करा, जेणेकरुन पुढील वेळेस आधार कार्ड हरवल्याच्या, सापडत नसल्याचे प्रकार घडल्यास तुम्ही मोबाईल नंंबर वापरुन ते पुन्हा मिळवु शकाल.