PPF Account: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पल्बिक प्रॉविडेंट फंड (Public Provident Fund) म्हणजेच पीएफ अकाऊंट (PPF Account) अत्यंत महत्त्वाचं असतं. पीपीएफ अकाऊंट ओपन केल्यानंतर त्यात सातत्याने ठराविक रक्कम जमा होणे गरजेचे असते. तसे न झाल्यास अकाऊंट इनअॅक्टीव्ह (inactive) होते. त्यामुळे त्यातील पैसे अडकून पडतात. जर तुमचे पीपीएफ अकाऊंट कोणत्याही कारणाने इनअॅक्टीव्ह झाले असल्यास ते पुन्हा अॅक्टीव्ह (active) करणे अत्यंत गरजेचे आहे. ते नेमकं कसं करायचं? जाणून घेऊया... (PPF मध्ये पैसा गुंतवून करोडपती होण्याची संधी; पाहा काय आहे फंडा)
पीपीएफ अकाऊंट मध्ये वर्षाला कमीत कमी 500 रुपये तर अधिकाधिक 1.5 लाख रुपये गुंतवणे गरजेचे असते. तुम्ही जर कमीत कमी रक्कम भरली नाही तर तुमचे अकाऊंट इनअॅक्टीव्ह होईल. पीएफ अकाऊंट इनअॅक्टीव्ह झाले असल्यास तुम्हाला लोन घेण्याची सुविधा मिळत नाही. (PPF, NSC, SSY या योजनांमधील गुंतवणूकीवर मिळते प्राप्तिकर सूट; जाणून घ्या नियम)
पीपीएफ अकाऊंट इनअॅक्टीव्ह होण्याचे अन्य तोटे देखील आहेत. 2016 मध्ये पीपीएफ नियमांचे बदल करण्यात आले. ज्यानुसार काही ठराविक परिस्थितीत मॅच्युरिटीपूर्वी पीपीएफ अकाऊंट बंद करण्याची अनुमती देण्यात आली आहे. पीपीएफ अकाऊंट पाच वर्षांपर्यंत चालल्यानंतरही खातेदार असे करु शकतात. विशेष म्हणजे पीपीएफ खात्यातील बॅलन्सवरुन लोन घेता येते. मात्र इनअॅक्टीव्ह पीपीएफ अकाऊंट मध्ये हा फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुमचे पीपीएफ अकाऊंट इनअॅक्टीव्ह झाले असल्यास तात्काळ अॅक्टीव्ह करुन घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.