आपल्या पैसे योग्य पद्धतीने गुंतववून तुम्ही करोडपती (Millionaire) होण्याचे स्वप्न बाळगून असाल तर आपल्यासाठी एक चांगला पर्यय आहे. हा पर्याय म्हणजे पीपीएफ (Public Provident Fund). होय, आपण पीपीएफ (PPF) मध्ये पैसे गुंतवून करोडपती (Crorepati) होऊ शकता. पीपीएफमध्ये पैसे गुंतवून (Investment In PPF) करोडपती होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या पैशांना व्याजदर भक्कम असतात. दुसरे म्हणजे या पैशांतून मिळणारा परतावा खात्रीशीर असतो. तसेच, पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशांना करसवलतही मिळते. पण, पीपीएफमध्ये गुंतवलेला पैसा हा दीर्घकालीन असतो. त्यामुळे त्याचा परतावा मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते हेही खरे. जाणून घ्या पीपीएफमध्ये पैसा गुंतवून करोडपती होण्याचा मार्ग.
पीपीएफ गुंतवणूक एक लोकप्रिय मर्ग
पीपीएफ ही एक लोकप्रिय गुंतवणूक मर्ग आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक करताना आपण प्रती वर्ष जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांपर्यांत पैसे गुंतवू शकता. 1.50 लाख रुपये ही पीपीएफमध्ये पैसै गुंतविण्यासाठी कमाल मर्यादा आहे. पीपीएफमध्ये आपण जे पैसै गुंतवता त्यावर पूर्णपणे करसवलत असते. ही सवलत इनकम टैक्स एक्ट (Income Tax Act, 1961) कलम 80 (C) अन्वये असते. पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशांची मॅच्योरिटी अवधी हा 15 वर्षे इतका असतो. पण, मॅच्योरिटी पूर्ण झाल्यानंतरही आपण पुढे 5-5 वर्षे ही गुंतवणूक कायम ठेऊ शकता. या पैशांवर आपल्याला व्याजही मिळते.
करोडपती बनण्याचा मार्ग
पीपीएफमध्ये गुंतवणूक करुन करोडपती होण्याचा मर्ग तेव्हाच सोपा होतो जेव्हा, आपण नोकरीस सुरुवात करता. किंवा एकादा व्यवसाय नव्याने सुरु करता. उदाहरणच द्यायचे तर समजा आपण नोकरीची सुरुवात केली तेव्हा आपण पीपीएफमध्ये प्रतिमहिना 4585 रुपये गुंतवणूक करत आहात. ही गुंतवणूक आपण 35 वर्षे कायम ठेवली आहे. तर 35 वर्षांत आपण करोडपती बनू शकता. पीपीएफच्या रकमेवर 7.9 % व्याज (Public Provident Fund Interest Rate) मिळते. (हेही वाचा, SBI मध्ये PPF खाते सुरु करुन मिळवा भरघोस व्याज, जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रिया)
तुम्हाला जर 35 वर्षे वाट पाहाटची नसेल तर आपण कमी कालावधी म्हणजेच 30 वर्षांतही करोडपती होऊ शकता. पण, त्यासाठी आपल्याला आपली गुंतवणूक वाढवावी लागेल. म्हणजेच 4585 रुपयांऐवजी आपल्याला प्रतिमहीना 6,945 रुपये म्हणजेच सर्वसाधारण 7000 रुपये इतकी रक्कम गुंतवावे लागतील. वरच्याच सूत्राने गणीत केले तर, आपण 30 वर्षांत करोडपती होऊ शकता. हीच गुंतवणूक आपण वाढवता आणि प्रतिमहीना 12,500 गुंतवता तर आपण 23 वर्षांमध्ये करोडपती होऊ शकता.