Home, Car Loan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Home Loan Rejection Reasons: तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज केल्यास, तुमचे प्रोफाइल बँका, गृहनिर्माण कंपन्या आणि ABFC कंपन्यांद्वारे तपासले जातात. त्यानंतरच तुम्हाला बँक किंवा NBFC कंपनीकडून गृहकर्ज दिले जाते. आज या लेखात आम्ही तुम्हाला त्या घटकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा गृहकर्ज अर्ज नाकारला जाण्याची शक्यता वाढते.

तुम्ही कर्जाची चौकशी करण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या बँका किंवा NBFC कंपन्यांकडे जात असाल तर तुमचा कर्ज अर्ज फेटाळला जाण्याची दाट शक्यता असते. कारण, जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बँक तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते. अशा परिस्थितीत, अनेक बँकांच्या वारंवार तपासण्यांमुळे तुम्हाला क्रेडिट हँग मानले जाते. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये फरक पडतो. कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. यासाठी कर्ज घेतानाच चौकशी करावी. (हेही वाचा - Financial Freedom Tips: कर्जमुक्त जीवन जगण्याचा वेगवान मार्ग, कसे मिळवाल आर्थिक स्वातंत्र्य? जाणून घ्या सात पर्याय)

वय

जर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतर गृहकर्जासाठी अर्ज केला तर ते मंजूर होण्याची शक्यता कमी असते. त्याच वेळी, जर 30 वर्षांच्या व्यक्तीने गृहकर्जासाठी अर्ज केला, तर कागदपत्रे योग्य असल्यास त्याचे गृहकर्ज लवकरच मंजूर केले जाईल. यामागे वयाचा घटक आहे. गृहकर्ज हे दीर्घकालीन कर्ज आहे आणि बँका ते फक्त अशा लोकांनाच देण्यास प्राधान्य देतात. ज्यांच्याकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी किमान 15 ते 20 वर्षे आहेत.

क्रेडिट इतिहास -

तुमचा क्रेडिट इतिहास नसला तरीही, तुमचा कर्ज अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, बँक तुमचे मूल्यांकन करू शकत नाही आणि तुमचा अर्ज नाकारला जातो.

ब्लॅक लिस्टेड प्रोजेक्ट -

अनेक वेळा काही प्रकल्प आणि क्षेत्रे बँका आणि NBFC कंपन्यांद्वारे काळ्या यादीत टाकल्या जातात. अशा परिस्थितीत तुम्ही अशा प्रकल्पातून किंवा क्षेत्रातून कर्जासाठी अर्ज केल्यास तुमचा कर्जाचा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता असते.

गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी खबरदारी घेणं आवश्यक आहे. गृह कर्जासाठी क्रेडिट स्कोअर 750 च्या वर असणं आवश्यक आहे. उत्पन्नाची सर्व कागदपत्रे गोळा करा. जुन्या फेडलेल्या कर्जाची कागदपत्रे सोबत ठेवा. मालमत्तेची कागदपत्रेही सोबत ठेवा.