![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/fggfsh-4-.jpg?width=380&height=214)
EPFO Interest Rate Hike: ईपीएफओ (EPFO) सदस्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येऊ शकते. सरकार पगारदार वर्गासाठी एक मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. याचा थेट फायदा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल. येत्या काळात लोकांना ईपीएफओमध्ये जमा केलेल्या पैशांवर जास्त व्याज मिळण्याची अपेक्षा आहे.
पीएफवरील व्याजदर वाढण्याची शक्यता -
लवकरच सरकार पीएफवरील व्याजदर वाढवू शकते, ज्यामुळे लोकांच्या बचतीत वाढ होईल. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ईपीएफओच्या पुढील बोर्ड बैठकीकडे सर्वांचे लक्ष असेल. ईपीएफओच्या या बैठकीत भविष्य निर्वाह निधीशी संबंधित सर्व निर्णय घेतले जातात. ज्यात व्याजदर वाढवण्याचा निर्णय देखील घेतला जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Income Tax वाचवायचा असेल तर 'या' 7 बचत योजनांमध्ये करा गुंतवणूक)
यापूर्वी, सलग 2वर्षे, सरकारने ईपीएफओवरील व्याजदर वाढवले आहेत. तसेच 2022-23 मध्ये, पीएफवरील व्याजदर सुधारित करून ते 8.15 पर्यंत वाढवण्यात आले. त्याच वेळी, सन 23-24 मध्ये ते पुन्हा बदलण्यात आले आणि ते 8.25 टक्के करण्यात आले. सध्या पीएफवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे.
सरकारने अद्याप ईपीएफओवरील व्याजदर वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु, मीडिया रिपोर्टनुसार, यावेळीही सरकार व्याजदरात 0.10 टक्के वाढ करू शकते. जर असे झाले तर पगारदार वर्गाला मोठा फायदा होईल. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, 2024-25 साठी व्याजदर 8.25% च्या जवळ ठेवला जाऊ शकतो.
दरम्यान, देशभरात EPFO चे 7 कोटींहून अधिक सदस्य आहेत. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी EPFO खूप महत्वाचे मानले जाते. कारण, त्यामुळे निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्या येत नाहीत आणि त्यांच्याकडे एक मोठा निधी शिल्लक राहतो. हा निधी ते निवृत्तीनंतर आरामात वापरू शकतात. दरमहा त्यांच्या पगारातून पीएफ फंडासाठी एक निश्चित भाग कापला जातो. तसेच कंपनीद्वारे देखील पीएफमध्ये योगदान देण्यात येते.