Harshwardhan Sapkal | Photo Credits: @VarshaEGaikwad

नाना पटोले (Nana Patole) यांच्यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष (President of the Maharashtra Pradesh Congress Committee) पदी हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांची वर्णी लागली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावं चर्चेत होती पण अखेर आज कॉंग्रेस कडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ हे विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार आहेत. ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय सुरूवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली आहे. 1999 ते 2002 या काळात ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. महाराष्ट्रातील ते सर्वात तरूण अध्यक्ष झाले होते. पुढे 2014-19 मध्ये आमदार झाले. आता त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

कॉंग्रेस कडून नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा

बुलढाण्यात जल्लोष

हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देताना आज कॉंग्रेस कडून आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.