( Pc: Insta)

Dubai: दुबईत एका टॅक्सी ड्रायव्हरने एका महिला प्रवाशाला अयोग्य टिप्पणी केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम युजर एनएसए थॉमसने हे फुटेज शेअर करत दावा केला आहे की, ड्रायव्हरने तिला तिच्या सेक्स लाईफबद्दल स्पष्ट प्रश्न विचारून अस्वस्थ केले. ड्रायव्हरने विचारले, "तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत किती वेळा सेक्स केला आहे?"  आणि मग थेट प्रश्न विचारला कि, "आज रात्री तुम्ही सेक्स केला नाही का?" हि धक्कादायक बाब समोर आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ड्रायव्हरच्या अयोग्य आणि असंवेदनशील प्रश्नांची त्या महिलेने नम्रपणे उत्तरे दिली, महिलेने सांगितले की, तिने पूर्णपणे योग्य कपडे घातले होते, तरीही ड्रायव्हरने असे प्रश्न विचारले. हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना या महिलेने सांगितले की, मी आतापर्यंत अशा घटना टाळण्याचा प्रयत्न करते, परंतु तरीही अशा घटनांना नेहमी तोंड द्यावे लागते.

व्हिडीओवर कमेंट करतांना  एकाने लिहिले की, 'मला वाईट वाटते की तुम्ही माझ्या देशात या परिस्थितीतून गेलात. तुमची तक्रार असेल तर ती थेट पोलिसांकडे करावी.  मी दुबईत अनेकदा टॅक्सी आणि उबरचा वापर केला आहे आणि मला अशा समस्यांचा सामना कधीच करावा लागला नाही.'

आणखी एकाने कमेंट करत लिहिले कि, ' तुमची इच्छा असेल तर या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला मदत करायला मला खूप आनंद होईल. गाडीचा तपशील, घटनेची तारीख आणि लोकेशन मला कळवा.'