Bengaluru Tragedy: बेंगळुरूच्या कडूगोडी भागातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीच्या एका विद्यार्थिनीने तिच्या अपार्टमेंटच्या 20 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आईने विद्यार्थ्याला मोबाईल फोन वापरण्याऐवजी अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यानंतर तिने हे गंभीर पाऊल उचलले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. ही विद्यार्थींनी फक्त 15 वर्षांची होती.

पोलिसांनी सांगितले की, कडूगोडी येथील अॅसेट्स मार्क अपार्टमेंटमध्ये राहणारी आणि दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. पीडित मुलीला तिच्या आईने मोबाईल फोन वापरल्याबद्दल फटकारले होते. तिची परीक्षा जवळ आली असल्याने तिच्या आईने तिला मोबाईल फोन न वापरता अभ्यास करण्यास सांगितले. याचा राग येऊन विद्यार्थिनीने तिच्या अपार्टमेंटवरून उडी मारून आत्महत्या केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)