![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/05/Untitled-design-65.jpg?width=380&height=214)
Boy Drowns In Water Tank In Thane: ठाणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका सोसायटीमध्ये पाण्याच्या टाकीत पडून एका तीन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईसोबत नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर तो मुलगा घरात खेळत असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा टाकीत घसरला आणि बुडाला. मुलगा बराचवेळ न दिसल्याने त्याच्या कुटुंबाला त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला.
पीडित मुलाच्या कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेले. परंतु, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Women Drown In Resort Pool: हृदयद्रावक! मंगळुरूमध्ये एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 महिलांचा रिसॉर्ट पूलमध्ये बुडून मृत्यू; पहा व्हिडिओ)
बोअरवेलमध्ये पडून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू -
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील कोटपुतली गावात खेळताना बोअरवेलमध्ये पडून चेतना नावाच्या तीन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलालाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले. पाच अयशस्वी प्रयत्नांनंतरही, चेतनाला अखेर 10 दिवसांनी वाचवण्यात आले. पीडित मुलीला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा - Katihar Boat Accident: कटिहारमध्ये 12 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली; 3 जण बेपत्ता, शोधकार्य सुरू)
प्राप्त माहितीनुसार, कोटपुतलीच्या किरतपुरा गावात असलेल्या बडियाली की धानी येथे चेतना 700 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकली होती. 23 डिसेंबर रोजी ती खेळत असताना बोअरवेलमध्ये पडली. त्यानंतर तिच्या पालकांना ती बोअरवेलमध्ये अडकल्याचे समजले.