Women Drown In Resort Pool: कर्नाटकातील मंगळुरू (Mangaluru) येथील उल्लाल बीचजवळील एका रिसॉर्टच्या स्विमिंग पूल (Resort Pool) मध्ये रविवारी तीन मुलींचा बुडून (Drown) मृत्यू झाला. निशिता एमडी (21), पार्वती एस (20) आणि कीर्तना एन (21) अशी मृत महिलांची नावे आहेत. तिन्ही महिला म्हैसूर येथील रहिवासी होत्या. या तिघीही 16 नोव्हेंबर रोजी बीचजवळील रिसॉर्ट वाज्को येथे राहण्यासाठी आल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशिताला पोहणे येत नव्हते. यानंतरही ती स्विमिंग पूलमध्ये उतरली. जेव्हा ती बुडू लागली तेव्हा तिला वाचवण्यासाठी पार्वतीनेही पूलमध्ये उडी घेतली, पण तिलाही बाहेर पडता आले नाही. नंतर कीर्तनाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही वेळातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी कलम 106 बीएनएस अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, मनोहर (रिसॉर्ट मालक) आणि भरत (रिसॉर्ट मॅनेजर) नावाच्या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे तीन महिलांपैकी एकीलाही पोहणे येत नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यावेळी ड्युटीवर एकही बचाव कर्मचारी उपस्थित नव्हता. घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुली स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना आणि बुडण्यापूर्वी मदत मागताना दिसत आहेत. (हेही वाचा - Katihar Boat Accident: कटिहारमध्ये 12 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली; 3 जण बेपत्ता, शोधकार्य सुरू)
मंगळुरूमध्ये 3 महिलांचा रिसॉर्ट पूलमध्ये बुडून मृत्यू, पहा व्हिडिओ -
The #Mangaluru Police have arrested the Owner (Manohar) and manager (Bharath) of the Vasco resort of Ullal in Mangaluru for negligence of their duty.Yesterday 3 girls drowned in the #swimmingpool of the resort. Police have registered FIR u/s 106 of BNS... pic.twitter.com/eB1ZlWhc7u
— Yasir Mushtaq (@path2shah) November 18, 2024
पिडिता म्हैसूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी -
व्हिडिओमध्ये तलावाच्या आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते. याप्रकरणी उल्लाल पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर मंगळुरूचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, तिघीही म्हैसूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनी होत्या. त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनास्थळाची तपासणी केल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार काही त्रुटी आढळून आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. (हेही वाचा - Boy Dead After Drowning In Water Tank At Vashi: वाशी येथील उद्यानातील पाण्याच्या टाकीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू)
तथापी, चौकशी केल्यानंतर उघडकीस आले की, रिसॉर्टमध्ये सात कर्मचारी ड्युटीवर होते. परंतु त्यापैकी कोणीही त्यावेळी तेथे उपस्थित नव्हते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्या मदतीसाठी तलावाजवळ कोणीही आले नाही. या घटनेनंतर रिसॉर्ट सील करण्यात आले आहे.